One Nation, One Election । केंद्रीय मंत्रिमंडळाने ‘वन नेशन, वन इलेक्शन’ या धोरणाला मंजुरी दिली आहे. या निर्णयानंतर निवडणूक सुधारणा प्रक्रियेत महत्त्वपूर्ण पाऊल टाकले गेले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या अध्यक्षतेखाली गुरुवारी झालेल्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत या विधेयकावर अंतिम मंजुरी देण्यात आली. यामुळे देशभरातील निवडणुका एकाच वेळी घेण्याची शक्यता उभी राहिली आहे.
Ladki Bahin Yojna । लाडक्या बहिणींसाठी धक्कादायक बातमी!
‘वन नेशन, वन इलेक्शन’ हा मुद्दा भाजपने अनेक वर्षांपासून आपल्या जाहीरनाम्यातून रेटले आहे. यासाठी माजी राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्या अध्यक्षतेखाली एक उच्चस्तरीय समिती स्थापन केली होती, ज्याने यासाठी सकारात्मक शिफारस केली. समितीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह, काँग्रेस नेते अधीर रंजन चौधरी, डॉ. सुभाष कश्यप यांसारख्या दिग्गजांचा समावेश होता.
आता, मंत्रिमंडळाने मंजुरी दिल्यानंतर, यासंदर्भातील विधेयक लवकरच संसदेत मांडले जाईल. हिवाळी अधिवेशनातच हे विधेयक सादर होण्याची शक्यता आहे. सर्वपक्षीय समितीची (जेसीपी) स्थापना केली जाईल, ज्यामध्ये प्रत्येक पक्ष आपली भूमिका मांडेल. विधेयकावर चर्चानंतर लोकसभा आणि राज्यसभेत मतदान होईल. एनडीए बहुमतात असल्याने, त्यांना पाठिंबा मिळाल्यास हे विधेयक मंजूर होईल आणि राष्ट्रपतींनी सह्या केल्यानंतर ते कायद्यात रूपांतरित होईल. दरम्यान, भाजपकडून दावा केला जात आहे की, ‘वन नेशन, वन इलेक्शन’मुळे निवडणुकीचा खर्च कमी होईल आणि विकास कामे अधिक गतीने होऊ शकतात.
Bjp । राजकारणातून धक्कादायक बातमी! भाजपच्या बड्या नेत्याला जीवे मारण्याची धमकी