Makar Sankranti 2024 । काल देशभरात मकर संक्रांत (Makar Sankranti) जल्लोषात साजरा करण्यात आली. मकर संक्रांत म्हटली की अनेकांना पतंग उडवण्याचा (Kite) मोह आवरत नाही. लहान मुलांपासून ते वयोवृद्ध व्यक्तींपर्यंत सर्वजण पतंग उडवताना दिसली. पण राज्यातील बहुतांश जिल्ह्यात काही दुर्देवी घटना घडल्या आहेत. पतंग पकडण्याच्या नादात एकाचा मृत्यू झाला आहे. (Latest marathi news)
Deepti Sharma । ICC कडून मोठी घोषणा! टीम इंडियाच्या ‘या’ खेळाडूला दिला पुरस्कार
चंद्रपूर (Chandrapur) येथे भानापेठ वॉर्ड येथे ही घटना घडली आहे. आनंद वासाडे हे त्यांच्या घराच्या स्लॅबवर हाेते. त्यावेळी त्यांना एक पतंग तुटलेली दिसली. ते ही पतंग पकडण्यासाठी पुढे गेले. पण पतंग पकडण्याच्या नादात त्यांचा स्लॅबवरून तोल गेला आणि ते खाली पडले. त्यात त्यांना गंभीर दुखापत झाली. त्यांच्या कुटुंबीयांनी त्यांना तातडीने शासकीय वैद्यकीय महाविद्यालयात दाखल केले.
Crime News । सुट्टी ठरली अखेरची! क्रिकेट सामन्यावरून झालेल्या वादात पोलीस हवालदाराचा खून
पण गंभीर दुखापत झाल्याने उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. या घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. तसेच नागपूर शहरातील विविध भागात प्रतिबंधित नायलॉन मांजामुळे 15 नागरिकांसह पशू पक्षी जखमी झाल्याची धक्कादायक घटना घडल्याचे समोर आले आहे. काही जखमी पक्ष्यांवर नागपूरच्या ट्रान्झिट ट्रीटमेंट सेंटर मध्ये उपचार सुरु आहे.
Maharashtra Politics । सर्वात मोठी बातमी! महायुतीत ठरला जागा वाटपाचा फॉर्म्युला