‘जैसी करणी वैसी भरणी’ अस म्हंटल जात. माणूस जस काम करतो तसाच त्याला मोबदला मिळतो. आपल्या चुकीच्या कर्माची शिक्षा आपल्याला मिळत असतेच. अशा आशयाचे अनेक नवनवीन व्हिडीओ आपण सोशल मीडियावर पाहत असतो. असाच एक व्हिडिओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.
भाजपला धक्का! गुजरात निवडणुकीच्या तोंडावर ‘या’ मंत्र्याचा काँग्रेसमध्ये प्रवेश
या व्हिडिओमध्ये एका ठिकाणी मोकळ्या अशा जागेवर एक लांडोर आपल्या अंड्यावर बसली आहे. याचवेळी एक व्यक्ती तिथून जात असतो. तो व्यक्ती लांडोरीची अंडी पाहतो. त्याला ती अंडी चोरण्याचा मोह आवरत नाही. ती अंडी ( Female Peacock egg) चोरण्यासाठी तो लांडोरीच्या दिशेने जातो.
दौंड तालुक्यातील शेतकरी गुलाब शेतीतून कमावतोय लाखो रुपये
धाडस करून तो त्या लांडोरला बाजूला करून एक अंडे हातात घेताना या व्हिडिओमध्ये ( Viral video) पहायला मिळत आहे. तो ते अंडे घेऊन पळून जायच्या बेतात असतानाच मोर या व्यक्तीला बघतो व त्या व्यक्तीच्या अंगावर झेप घेतो.
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत अजित पवारांचं वक्तव्य चर्चेत; पाहा नेमकं काय म्हणाले?
यावेळी त्या व्यक्तीची घाबरगुंडी उडते. हा अंडी चोरणार माणूस मोराच्या हल्ल्याने क्षणात खाली कोसळतो. मोर इतक्यातच थांबत नाही. तो आपल्या चोचीने अंडी चोरणाऱ्या व्यक्तीला मारायला सुरुवात करतो. यानंतर चोर ( Egg thief) आपला जीव वाचवत पळून जाताना हा व्हिडीओमध्ये पहायला मिळत आहे. हा व्हिडिओ अतिशय रंजक असून याला सोशल मीडियावर भरपूर views व लाईक मिळाले आहेत.
ऊसतोड मजुराची एक मुलगी बनली इंजिनियर तर दोन मुली बनणार डॉक्टर; वाचा सविस्तर