राज्यात महापुरुषांबद्दल वक्तव्य करून चर्चेत येण्याचे सत्र सुरू असल्याचे पहायला मिळते. मागील काही दिवसांत भाजपच्या महत्त्वाच्या व मोठया नेत्यांनी चुकीची वक्तव्ये करत महापुरुषांचा अपमान केला आहे. राज्याचे राज्यपाल भगतसिंग कोश्यारी ( Bhagatsing Koshyari) यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल वादग्रस्त वक्तव्य केल्याने राज्यात ठिकठिकाणी आंदोलने होत आहेत. या पार्श्वभूमीवर आज मुंबई येथे महाविकास आघाडीचा भव्य मोर्चा असणार आहे. यावर आमदार बच्चू कडू यांनी “महाविकास आघाडीचा मोर्चा ऐतिहासिक असणार आहे”, असे म्हणत या मोर्चाला समर्थन दिले आहे.
गौतमी पाटीलच्या कार्यक्रमात पुन्हा एकदा राडा; स्टेजवर झाली दगडफेक
महापुरुषांचा अपमान केला म्हणून मोर्चे निघत आहेत. ही चांगलीच गोष्ट आहे. महापुरुषांबद्दल कोणी वाईट बोलत असेल तर त्याला रट्टे दिले पाहिजेत, असे बच्चू कडू यावेळी म्हणाले आहेत. तसेच राज्यपालांनी यापुढे महापुरुषांबद्दल असे बोलू नये. फक्त तेच नाहीत तर इतर पक्षातील नेत्यांनी सुद्धा महापुरुषांबद्दल (Words About Legends) सांभाळून बोलावे. असे शिंदे गटाचे नेते आमदार बच्चू कडू म्हणाले आहेत.
“बिनकामाचे लोकं मोर्चा काढतात”; एकनाथ शिंदेंचा विरोधकांना खोचक टोला
भाजप पक्षामधील नेत्यांनी एकापाठोपाठ छत्रपती शिवाजी महाराज, सावित्रीबाई फुले, महात्मा फुले यांच्याबद्दल चुकीची वक्तव्ये केली आहेत. यामुळे महाविकास आघाडीने आक्रमक भूमिका घेतली असून आज मुंबई येथे भव्य महामोर्चाचे आयोजन करण्यात आले आहे. मुंबईमधील जिजामाता उद्यान ते आझाद मैदान असा हा मोर्चा असेल. दरम्यान या मोर्चासाठी अजूनही परवानगी मिळाली नाही. परंतु, “परवानगी मिळवणे फार मोठी गोष्ट नाही”. असे अजित पवार (।Ajit Pawar) म्हणाले आहेत. यामुळे या मोर्चाकडे सर्वांचे लक्ष लागून राहिले आहे. यामध्ये सीमावाद, बेरोजगारी या प्रश्नांवर देखील शिंदे-फडणवीस सरकारला जाब विचारला जाणार आहे.