OnePlus 12R । मोबाईल खरेदी करताय तर थांबा, OnePlus 12R स्मार्टफोन ‘या’ दिवशी होतोय लॉन्च; जाणून घ्या किंमत किती असेल?

OnePlus 12R

OnePlus 12R । नवीन वर्ष ४ दिवसांनी सुरु होणार आहे. त्यामुळे अनेकांनी आपल्या नवीन वर्षाचे खास प्लॅन देखील बनविले आहेत. अनेकजण नवीन वर्षात वेगेवेगळ्या गोष्टी खरेदी करतात. यामध्ये बरेच जण नवीन वर्षात मोबाईल खरेदी करण्यास प्राधान्य देतात. जर तुम्हीही नवीन वर्षात मोबाईल खरेदी करायचा विचार करत असाल तर ही बातमी तुमच्यासाठी. नवीन वर्षांमध्ये आघाडीची स्मार्टफोन कंपनी OnePlus दोन नवीन फोन लॉन्च करणार आहे.

Sharad Pawar । राम मंदिर लोकार्पण सोहळ्याच्या निमंत्रणाबाबत शरद पवार यांनी केले मोठे वक्तव्य

OnePlus 12 आणि OnePlus 12R हे दोनी फोन कंपनी लाँच करणार आहे. 23 जानेवारीला भारतीय बाजारात हे फोन लॉन्च होणार आहेत. कंपनीने याबाबत सोशल मीडियावर माहिती शेअर केली आहे. हे दोन्ही फोन हँडसेट निर्मात्याच्या फ्लॅगशिप OnePlus 12 सीरीज अंतर्गत येतील. त्याचबरोबर या फोनचे काही कलर देखील समोर आले आहेत. OnePlus 12R आयर्न ग्रे आणि कूल ब्लू कलरमध्ये लॉन्च केला जाईल.

Ram Mandir | 16 बिघा जमीन विकली, नातेवाईकांकडून उसने घेतले, राम मंदिरासाठी या व्यक्तीने दिले 1 कोटी रुपये

OnePlus 12R जाणून घ्या काय आहेत वैशिष्ट्ये?

OnePlus 12R 6.78 इंच वक्र-एज OLED डिस्प्लेसह ऑफर केला जाऊ शकतो. यात 120Hz रिफ्रेश रेट आणि 1.5K रिझोल्यूशन अपेक्षित आहे. आगामी स्मार्टफोनमध्ये Snapdragon 8 Gen 2 चिपसेट सपोर्ट केला जाऊ शकतो. त्याच वेळी, 16GB रॅम आणि 256GB स्टोरेज पर्याय मिळण्याची शक्यता आहे. त्यामुळे तुम्ही जर फोन खरेदी करायचा विचार करत असाल तर तुम्ही याला प्राधान्य देऊ शकता.

Pune Fire News । सर्वात मोठी बातमी! पुण्यामध्ये एकाच वेळी 10 सिलेंडरचा झाला स्फोट

OnePlus 12R: किंमत किती?

OnePlus ची नवीन स्मार्टफोन सीरीज 23 जानेवारीला लॉन्च होणार आहे. कंपनीने अद्याप किंमतीबाबत कोणतीही अधिकृत माहिती दिलेली नाही. रिपोर्ट्सनुसार, OnePlus 12R ची संभाव्य किंमत 40 हजार ते 42 हजार रुपयांच्या दरम्यान असू शकते. कंपनी लॉन्च दरम्यानच अधिकृत किंमती जाहीर करेल.

Bjp । ब्रेकिंग! भाजप नेत्याच्या पोल्ट्री फार्मवर पोलिसांनी मारला छापा, अवैध दारूच्या 14 हजार बाटल्या जप्त

Spread the love