
शेतकऱ्यांना ‘जगाचा पोशिंदा’ म्हणून ओळखले जाते. शेतकरी शेतात काबाडकष्ट करून पीक पिकवतात म्हणून आपण घरात बसून अन्न खातो. परंतु, शेतकऱ्याला अनेक अडचणींचा सामना करावा लागतो. सध्या कांद्याला दर नसल्याने शेतकरी काळजीत आहेत. अशातच एका कांदा ( Onion) उत्पादक शेतकऱ्याला मोठा आर्थिक फटका बसल्याची माहिती समोर आली आहे. कांद्याच्या 205 किलोचा विक्रीतून या शेतकऱ्याला फक्त 8 च रुपये मिळाले आहेत.
दुसऱ्या टप्प्यातील मंत्रिमंडळ विस्तार लवकरच; भाजपच्या ‘या’ नेत्यांची नावे चर्चेत
कर्नाटकमधील गदग ( Gadag’s Farmer) येथे हा प्रकार घडला असून, आपल्या कांद्याला चांगला दर मिळावा यासाठी हा शेतकरी दूरच्या बाजारपेठेत आपला कांदा विक्रीसाठी घेऊन गेला होता. कांद्याच्या विक्रीसाठी या शेतकऱ्याने 415 किमी दूर असणाऱ्या बंगळुरूच्या यशवंतपूर मंडईची (Yashwantpur Market) वाट धरली. या ठिकाणी तब्बल 205 किलो कांदा घेऊन हा शेतकरी गेला होता.
सोनिया गांधींच्या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन
परंतु, बाजारात कांद्याला दर नसल्याने या शेतकऱ्याला 205 किलोच्या कांद्याच्या विक्रीतून फक्त 8 रुपये 36 पैसे मिळाले आहेत. कांद्याच्या मालवाहतूकीसाठी 377 रुपये आणि कांदा उचल शुल्क 24 रुपये वजा होऊन या शेतकऱ्याच्या हातात एवढे पैसे उरले होते. कांद्याला दर नसल्याने हताश होऊन या शेतकऱ्याने कांदा विक्रीची पावती आपल्या सोशल मीडिया अकाउंटवर शेअर केली. यावेळी हा प्रकार लक्षात आला.