काही दिवसांपूर्वी राज्यात अवकाळी पावसाने धुमाकूळ घातला होता. यामुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले होते. यापार्श्वभूमीवर अनेक अधिकाऱ्यांनी व राजकीय नेत्यांनी (Politicians) नुकसान ग्रस्त शेतीची पाहणी करून गेले आहेत. शेतकऱ्यांना मदतीने आश्वासन देखील दिले गेले आहे. मात्र प्रत्यक्षात शेतकऱ्यांना मदत मिळालेली नाही. यामुळे शेतकऱ्यांमध्ये राजकीय नेत्यांबद्दल अढी निर्माण झाली आहे. (Farmers from Nashik get hyper on politicians)
अहमदनगरच्या दंगलीवरून शरद पवार संतापले; म्हणाले, “या धर्माचा…”
दरम्यान आपला संताप व्यक्त करण्यासाठी नाशिक (Nashik) मधील शेतकऱ्यांनी राजकीय नेत्यांविरोधात अतिशय आक्रमक भूमिका घेतली आहे. गावात मंत्री, खासदार, आमदार यांपैकी कोणीही आले तरी त्याच्यावर कांदे फेकायचे. असे धोरण शेतकऱ्यांनी अवलंबिवले आहे.
डेअरी मिल्क कॅडबरीच्या पॅकेजिंगचा रंग नेहमी जांभळाच का असतो? जाणून घ्या सविस्तर
मागील अनेक महिन्यांपासून शेतकऱ्यांच्या कांद्याला भाव मिळत नाही. यासाठी सरकारने कांदा अनुदान जाहीर केले आहे. मात्र अजूनही ते शेतकऱ्यांपर्यंत पोहोचलेले नाही. यामुळे नाशिकच्या सटाणा तालुक्यातील मुंजवाड गावाच्या कांदा उत्पादक शेतकरी आणि शेतकरी क्रांती मोर्चाच्या कार्यकर्त्यांनी आमदार, खासदार, मंत्री तसेच राजकीय पक्षांच्या नेत्यांना गावबंदी करण्याचा निर्णय घेला आहे.
सर्वसामान्यांसाठी दिलासदायक बातमी! खाद्य तेलाच्या किमतीमध्ये कपात, जाणून घ्या काय आहेत दर?
महत्त्वाची बाब म्हणजे या निर्णयाची योग्य अंमलबजावणी व्हावी, यासाठी गावाने तसा ठराव देखील केला आहे. गावात प्रवेश करणाऱ्या राजकीय नेत्यांवर व लोकप्रतिनिधींवर कांदा फेकून निषेध व्यक्त करायचा असा हा ठराव आहे. या संदर्भातील फलक गावाच्या चारही बाजूने लावण्यात आले आहेत.
तारक मेहता मालिकेमधील दयाबेन बाबत समोर आली धक्कादायक माहिती; वाचून तुम्हालाही बसेल धक्का