
सध्या कांदा (Onion) पुन्हा शेतकऱ्यांना रडवत असल्याचे चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे. येणाऱ्या काही दिवसात कांद्याचे दर अजून कमी होणार असल्याची शक्यता वर्तवली जात आहे. त्यामुळे शेतकरी राजा संतप्त झाला आहे. नाशिकमध्ये टोमॅटोचे (tomato) दर खूप घसरले आहेत. आता त्यापाठोपाठ कांद्यालाही कवडीमोल भाव मिळत असल्याने शेतकरी चिंतेत आहेत.
‘हेरा फेरा ३’साठी अक्षय कुमारने मागितले ‘इतके’ कोटी मानधन; वाचा सविस्तर
दरम्यान, मागच्या पंधरा दिवसापासून कांद्याचे दर कमी होत चालले आहेत. पंधरा दिवसांपूर्वी कांद्याला क्विंटलला तीन ते चार हजार रूपये भाव मिळत होता, तोच कांदा दीड ते दोन हजार रुपयांनी खरेदी केला जातोय. त्यामुळे शेतकरी नाराज असल्याचे चित्र पाहायला मिळत आहे. नाशिकला कांद्याचे आगार समजले जाते या जिल्ह्यातच कांदा उत्पादक शेतकरी संतप्त झाल्याचं पाहायला मिळत आहे.
नियमित वीजबिल देणाऱ्या शेतकऱ्यांसाठी खुशखबर; देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा
नाशिक जिल्ह्यात कांद्याची लागवड मोठ्या प्रमाणात होते. कांद्याचा उत्पादन खर्च प्रति किलो ला 22 ते 25 रुपये येतो. पण शेतकऱ्यांचा सध्या हा खर्च देखील निघत नाही. त्यामुळे शेतकरी चिंतेत आहेत. कांद्याला जास्त भाव मिळण्यासाठी केंद्र सरकारने जास्तीत जास्त कांदा परदेशात निर्यात करावा अशी मागणी जोर धरू लागली आहे.
“मला काही झालं तर…”, संजय राऊतांचा राज्य सरकारला गंभीर इशारा