कापसाला दर न मिळाल्याने औरंगाबाद येथील एका तरुण शेतकऱ्याने नुकतीच आत्महत्या केली होती. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून कांद्याला देखील दर नाही. यामुळे शेतकरी अनेक अडचणींचा सामना करत आहेत. एवढे दिवस कष्ट करून देखील कांद्याला दर ( Onion Rate) न मिळाल्याने कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले होते. परंतु, आता आता कांदा उत्पादक शेतकऱ्यांसाठी आनंद देणारी बातमी समोर आली आहे. कृषी उत्पन्न बाजार समित्यांमध्ये कांद्याचे (APMC) दर दुप्पट झाले आहेत.
कुत्र्याच्या एका चुकीमुळे मालकाचे नुकसान! संपूर्ण घर जळून खाक
याआधी कांद्याच्या किंमती 10 ते 12 रुपये प्रतिकिलो अशा होत्या. आता मात्र तोच कांदा 20 ते 25 रुपये प्रतिकिलो पर्यंत पोहचला आहेे. नवीन कांदा तयार होण्यास अजून एक ते दीड महिना जाऊ शकतो यामुळे कांद्याचे दर अजून वाढण्याची शक्यता व्यापारी करत आहेत. मागील काही महिन्यांत बाहेरच्या राज्यातून कांद्याची आयात देखील वाढली होती. त्यामुळे कांद्याचे दर पडले होते. मात्र आता कांद्याचे दर तेजीत आल्याने शेतकरी खुशीत आहेत.
बिग ब्रेकिंग! अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची तब्येत बिघडली
अवकाळी पावसामुळे शेतातील नवीन पीक खराब झाले व नवीन कांदा बाजारात येऊ शकला नाही. त्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे जूने कांदे हे जवळपास संपले आहेत. अशातच परराज्यातून येणारा कांदा देखील कमी झालाय. यामुळे कांद्याला चांगलाच दर आला आहे. बाजारात नवीन पीक येईपर्यंत कांद्याचे दर अजून किती वाढतात हे पाहणे महत्वाचे असणार आहे. दरम्यान यामुळे ग्राहकांच्या खिशाला कात्री लागणार एवढ मात्र नक्की.