Onion Rate । कांद्याचा पुन्हा वांदा.. ठेवला तर सडतोय अन् विकला तर भाव नाही

onion rate falls down,If you keep it, it rots and if you sell it, there is no value

Onion Rate । नाशिक : कांदा (Onion) हे एक असे नगदी पीक आहे ज्याची दरवर्षी मोठ्या प्रमाणात लागवड केली जाते. परंतु दुःखद बाब अशी की कांदा उत्पादक शेतकऱ्यांना कधीतरी चांगला हमीभाव (Onion Price) मिळतो. राज्यात मोठ्या प्रमाणात शेतकरी उन्हाळी कांद्याची लागवड करतात. कारण या कांद्याला पावसाळ्याच्या दिवसात (Rainy Days) मोठ्या प्रमाणात मागणी असते. परंतु सध्या या कांद्याची मागणी कमी झाली आहे. (Latest Marathi News)

धक्कादायक! राज्यातील 3500 गावे संपर्काविनाच, नाहीत ‘या’ सुविधा

त्यामुळे शेतकऱ्यांनी कांदा चाळीत साठवलेला कांदा सडू लागला आहे. एकीकडे कांद्याला भाव नाही (Onion Rate Falls Down) तर दुसरीकडे कांदा चाळीत सडू लागल्याने शेतकरीवर्ग कमालीचा चिंतेत सापडला आहे. कांदा चाळीत सडू द्यावा की तो कवडीमोल भावात विकावा असा प्रश्न त्यांच्यापुढे निर्माण झाला आहे. सडलेला कांदा बाहेर काढून पुन्हा चाळ भरली तर शेतकऱ्यांना आर्थिक फटका बसू शकतो.

16 MLA Disqualification Case । ब्रेकिंग! शिवसेना आमदारांच्या अपात्रतेसंदर्भात महत्वाची माहिती आली समोर

मुसळधार पावसामुळे काही दिवसांपूर्वी कांद्याचे भाव वाढले होते. परंतु त्यानंतर पुन्हा हे भाव कोसळले आहे. त्यामुळे यंदाही कांद्याने शेतकऱ्यांच्या डोळ्यात पाणी आणले आहे. येत्या काळात जर कांद्याचे भाव वाढले नाही तर शेतकरीवर्गाच्या अडचणी वाढू शकतात.

“दुसऱ्यांचे पक्ष फोडण्यापेक्षा भाजपने स्वतःचा पक्ष बांधावा”, मनसेने दिला भाजपला सल्ला

Spread the love