दिनांक १० जानेवारी २०२२ पासून दौंडमध्ये कृषी प्रदर्शनाला सुरवात झाली आहे. यावेळी कृषी प्रदर्शनात बोलताना चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) म्हणाले, “फक्त बारामतीचा विकास केला म्हणजे मतदारसंघाचा विकास होत नाही”. अशी बोचरी टीका बावनकुळे यांनी कोणाचही नाव न घेता केली आहे.
मोठी बातमी! राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदारावर खुनाचा आरोप
यावेळी पुढे बोलताना बावनकुळे म्हणाले, विकास केला असं म्हणणाऱ्यांनी 50 वर्ष सत्ता उपभोगली त्यामुळे विकास केला म्हणजे कोणावर उपकार केले नाही. यांच्या सत्तेचा वापर कंत्राटदारांसाठी मोठ्या प्रमाणावर झाला असं देखील ते यावेळी म्हणाले आहेत.
‘कोयता गँग’ला आळा घालण्यासाठी ‘स्पेशल स्कॉड’; पोलिस महासंचालक रजनीश शेठ यांची माहिती
दरम्यान, या प्रदर्शनामध्ये विविध योजनांची माहिती, त्याचबरोबर महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळत आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये कृषी यांत्रिकीकरण (Agricultural Mechanization), शेतीशी संबंधित, उत्पादक ते ग्राहक, खाद्यसंस्कृती, नर्सरी यासंदर्भातीलही स्टॉल उपलब्ध आहेत.
राज ठाकरे यांच्या पत्नीने ‘वेड’ चित्रपट पाहण्यासाठी अख्ख चित्रपटगृहच केलं बुक!