कसबा आणि चिंचवड पोटनिवडणुकीचा निकाल आज जाहीर होणार असून सकाळी आठ वाजल्यापासून मतमोजणी सुरू झाली आहे. कसबा पेठ निवडणुकीमध्ये हेमंत रासने आणि रवींद्र धंगेकर यांच्यामध्ये काँटे की टक्कर पाहायला मिळत आहे. पहिल्या फेरीपासून काँग्रेसचे उमेदवार रवींद्र धंगेकर हे आघाडीवर आहेत.
भाजपच्या हातातून कसबा निसटणार? रवींद्र धंगेकर आणि हेमंत रासने यांच्यात कोण आघाडीवर? वाचा एका क्लीकवर
सध्या अठरावी फेरी चालू असून रवींद्र धंगेकर आघाडीवर आहेत तर हेमंत रासने पिछाडीवर आहेत. रवींद्र धंगेकर आघाडीवर असतानाच त्यांच्या कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण देखील चालू केली आहे. कार्यकर्ते मोठमोठ्याने घोषणा करताना दिसत आहेत.
मोठी बातमी! सातव्या फेरीत हेमंत रासने आघाडीवर तर धंगेकरांच्या आघाडीला ब्रेक
कसबा पोटनिवडणुकीत अठराव्या फेरीत रवींद्र धंगेकर यांना ६७ हजार ९५३ मते मिळाली. तर हेमंत रासने यांना ५८ हजार ९०४ मते मिळाली आहेत.
सहाव्या फेरीत अभिजीत बिचुकलेंना मिळाली ‘इतकी’ मत; आकडा पाहून व्हाल थक्क