लावणी म्हंटल की आजकाल लोकांना फक्त गौतमी पाटील आठवते. कारण, मागील काही दिवसांपासून राज्यात गौतमी पाटील हे नाव प्रचंड चर्चेत आहे. महाराष्ट्रामध्ये गौतमी पाटीलला कोणी ओळखत नाही असं शोधूनही सापडणार नाही. तिच्या हटके डान्समुळे ती सोशल मीडियावर कायम चर्चेत असते. मुलांच्या वाढदिवसानिमित्त किंवा इतर काही कार्यक्रमानिमित्त गौतमीला आमंत्रित केले जाते.
बिग ब्रेकिंग! सरकारी कर्मचाऱ्यांचा संप मागे
दरम्यान, सध्या एका हौशी नवऱ्याने तर बायकोच्या वाढदिवसानिमित्त चक्क गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला आहे. एवढंच नाहीत तर त्याने गौतमीच्या हाताने केक देखील कापला आहे. त्यामुळे आता सगळीकडे याचीच चर्चा होत आहे.
अबब! गाडीला लॉक असल्याने चोरट्यांनी चक्क टायर चोरून नेले
आष्टी तालुक्यातील निमगाव बोडखा येथील किरण गावडे यांनी बायकोच्या वाढदिवसानिमित्त गौतमी पाटीलचा कार्यक्रम ठेवला. त्यामुळे याची सगळ्या गावात जोरदार चर्चा होत आहे. त्याचबरोबर या कार्यक्रमाची सोशल मीडियावर देखील चांगलीच चर्चा रंगली आहे. बायकोचा वाढदिवसाला गौतमीचा कार्यक्रम ठेवल्याने साजरा गावात सगळीकडं या वाढदिवसाची चर्चा रंगली आहे.
धक्कदायक घटना! रेल्वे स्टेशनवरील स्क्रीनवर चक्क ३ मिनिटे सुरू होता पॉर्न व्हिडीओ