Success story | शेतकऱ्याचा नादच खुळा! कोथिंबीरतून अवघ्या ४५ दिवसात घेतलं १६ लाखांचं उत्पन्न

Open the voice of the farmer! Income of 16 lakhs taken from coriander in just 45 days

Success story । लातूर : ज्याच्याकडे वावर असते त्याच्याकडे पॉवर असते असे म्हटले जाते. याचा प्रत्यय तुम्हाला आलाच असेल. जर शेतात (Farm) दिवस-रात्र मेहनत केली आणि चांगला हमीभाव मिळाला तर शेतकऱ्यांना करोडो रुपयांचा मालक व्हायला वेळ लागत नाही. राज्यात मागील काही दिवसांपासून पावसाने धुमाकूळ (Heavy Rain in Maharashtra) घातला आहे. परंतु याचा फायदा राज्यातील अनेक शेतकऱ्यांना झाला आहे. (Latest Marathi News)

Pik Vima : ब्रेकिंग! शेतकऱ्यांसाठी महत्वाची बातमी, पिक विम्यासाठी मिळाली मुदतवाढ; ‘या’ तारखेपर्यंत करू शकताय अर्ज

मागील काही दिवसांपासून टोमॅटोचे दर (Tomato rates) गगनाला भिडले आहेत. आता टोमॅटोपाठोपाठ कोथिंबीरचेही दर (Coriander Price Hike) वाढले आहेत. लातूर जिल्ह्यातील आशिव गावचे शेतकरी रमाकांत वळके-पाटील यांनी कोथिंबिरतून 16 लाखांचं उत्पन्न (Coriander Price) मिळवले आहे. त्यांच्याकडून एकूण २० एकर शेती आहे त्यात त्यांनी यापूर्वी द्राक्ष, ऊसाचे पीक घेतले. परंतु, त्यांना त्यात नफा मिळाला नाही.

Ibrahim Ali Khan | इब्राहिमचा शर्टलेस व्हिडीओ व्हायरल; कमेंट करत नेटकरी म्हणाले, “हा तर खूपच…”

त्यामुळे त्यांनी मागील चार वर्षांपासून कोथिंबीर लागवड करण्याचा निर्णय घेतला. यावर्षी कोथिंबीरला चांगले दर मिळाल्याने त्यांना 16 लाख रुपयांचे उत्पन्न मिळाले आहे. विशेष म्हणजे त्यांना अवघ्या दोन महिन्याच्या आत आणि कमी खर्चात चांगली कमाई करता आली आहे. त्यांना एकरी २० हजार रुपये खर्च आला. पाच एकर क्षेत्रावर लाखो रुपयांचा फायदा झाल्याने त्यांच्या कुटुंबामध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.

Seema Haider Case । एक वेळचं जेवणही मिळणं कठीण, सीमा हैदरमुळे वाढल्या सचिनच्या समस्या

विशेष म्हणजे मागील चार वर्षाचा जर हिशोब काढायचा झाला तर त्यांना एक कोटी पेक्षा जास्त उत्पन्न कोथिंबीरतून घेता आले आहे. त्यांनी या कोथिंबीरच्या पैशातून लातूरला घर, गाडी घेतली असून मुलांचा उच्च शिक्षण झालं.

Twitter Monetisation । इलॉन मस्कचं यूजर्सना मोठं गिफ्ट! आता ट्विटरमधूनही कमावता येणार पैसे; कस ते घ्या जाणून..

Spread the love