OpenAI सीईओ सॅम ऑल्टमन (Sam Altman) सध्या चॅट जीपीटीनंतर त्यांच्या लग्नासाठी चर्चेत आहेत. त्यांनी दीर्घकाळचा प्रियकर ऑलिव्हर मुल्हेरिनशी लग्न केले आहे. ते कोण आहेत माहित आहे का? सोशल मीडियावर हे फोटो समोर येताच लोकांचा यावर विश्वास बसेना. हे फोटो एआयच्या मदतीने बनवण्यात आले आहेत, अशी कमेंट यूजर्स करू लागले. मात्र, आता सॅम ऑल्टमनने स्वत: याला दुजोरा दिला आहे. त्यांनी सांगितले की त्यांचे लग्न ऑलिव्हर मुल्हेरिनशी झाले आहे.
Ravindra Chandrashekhar | बिग ब्रेकिंग! प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीची प्रकृती बिघडली, ICU मध्ये दाखल
स्वत: ऑलिव्हर मुल्हेरिनने इन्स्टाग्रामवर लग्नाचे फोटो शेअर केले आहेत. त्यांच्या लग्नाला फारसे लोक उपस्थित नसल्याचे व्हायरल झालेल्या फोटोंवरून दिसत आहे. त्यांच्या लग्नाचे फोटो सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहेत. सगळीकडे या दोघांचीच चर्चा होताना दिसत आहे.
कोण आहे ऑलिव्हर मुल्हेरिन? सॅम ऑल्टमन हा तोच माणूस आहे ज्याने गेल्या वर्षी चॅट जीपीटी लाँच करून खळबळ उडवून दिली होती. सॅम आणि ऑलि यांची मैत्री खूप जुनी आहे. ऑलि यांनी मेलबर्न विद्यापीठातून सॉफ्टवेअर अभियांत्रिकीमध्ये पदवी प्राप्त केली आहे. ऑलिच्या लिंक्डइन प्रोफाइलनुसार, त्यांनी मेटामध्ये 2 वर्षे काम केले आणि नोव्हेंबर 2022 मध्ये कंपनी सोडली. इंटरनेट ऑफ थिंग्ज (IoT) क्षेत्रात ओली यांनी प्राविण्य मिळवले आहे.
Sujay Vikhe Patil । नगरकरांसाठी खासदार सुजय विखे पाटील यांनी केली सर्वात मोठी घोषणा!
ऑलिव्हर मुल्हेरिन यांनी त्यांच्या महाविद्यालयीन काळात अनेक एआय प्रकल्पांवर काम केले आहे. गेल्या वर्षी NYT ला दिलेल्या एका मुलाखतीत सॅमने सांगितले की ऑलीला एक मोठे कुटुंब आवडते आणि त्या दोघांनाही लवकरच मूल होणार आहे. न्यूयॉर्क टाइम्सच्या दुसर्या अहवालानुसार, मुल्हेरिन आणि ऑल्टमॅन सॅन फ्रान्सिस्कोच्या रशियन हिलवर एक घर सामायिक करतात, जे ओपनएआयच्या सीईओने तब्बल $27 दशलक्षला विकत घेतले.