Yugendra Pawar । बारामती : राज्यात लवकरच निवडणुका (Election 2024) पार पडणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षामध्ये (NCP) आणि शिवसेनेत (Shivsena) फूट पडल्याने आगामी निवडणुका अटीतटीच्या असणार आहेत, हे नक्कीच. दरम्यान, उपमुख्यमंत्री अजित पवारांनी (Ajit Pawar) शरद पवारांना (Sharad Pawar) धक्क्यांवर धक्के दिले आहेत. अशातच आता अजित दादांना घरातूनच विरोध असल्याचे बोलले जात आहे. (Latest marathi news)
अजित पवारांचे पुतणे युगेंद्र पवार हे आता शरद पवार यांच्यासोबतच जाणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. उद्या युगेंद्र पवार बारामतीतील खासदार सुप्रिया सुळे (Supriya Sule) यांच्या प्रचार कार्यालयास भेट देऊन शरद पवार गटातील कार्यकर्त्यांशी चर्चा करणार आहेत, अशी माहिती शरद पवार गटाचे बारामती शहराध्यक्ष अँड. संदीप गुजर यांनी ही माहिती दिली आहे.
Maratha Reservation । मराठा आरक्षणाला ओबीसींचा विरोध, टायर जाळत रास्ता रोको आंदोलन
अजित पवारांचे बंधू श्रीनिवास पवार यांचे युगेंद्र पवार हे चिरंजिव असून ते सक्रीय राजकारणात नाहीत. युगेंद्र पवार हे विद्या प्रतिष्ठान संस्थेचे खजिनदार आहेत. बारामती तालुका कुस्तीगीर संघाचेही ते काम पाहतात. व्यावसायिक जबाबदा-या ते सांभाळतात. पण आता ते सुप्रिया सुळे यांच्या बाजूने प्रचार करणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यामुळे अजित पवारांना मोठा धक्का बसला आहे.