Agri News । अमरावती : राज्यातील शेतकरी मोठ्या प्रमाणावर संत्री (Oranges) या लिंबूवर्गीय फळाची लागवड (Oranges Cultivation) करतात. संत्रीला दरवर्षी चांगली मागणी असते. बाजारभाव चांगले (Oranges Price) मिळाल्याने संत्री उत्पादक शेतकऱ्यांना त्याचा खूप फायदा होतो. परंतु, प्रत्येक वर्षी या शेतकऱ्यांना अवकाळी पाऊस, अतिवृष्टी यांसारख्या नैसर्गिक संकटांचा सामना करावा लागतो. यंदाच्या वर्षी शेतकरी फळगळतीमुळे (Fruit drop) संकटात सापडले आहेत. (Latest Marathi News)
Santosh Bangar । सर्वात मोठी बातमी! संतोष बांगर यांच्याविरोधात गुन्हा दाखल, ‘ती’ चूक पडली महागात
अमरावतीमधील फळगळतीमुळे शेतकऱ्यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होत आहे. संत्री उत्पादकांनी आता आपल्या शेतातील संत्री बागेवर कुऱ्हाड चालवण्यास सुरूवात केली आहे. खराब झालेली संत्री शेतकरी आता नदीकाठी फेकून देऊ लागले आहेत. यावर कोणता उपाय करावा याबाबत कृषी विभागाकडून आवश्यक ते मार्गदर्शन केले जात नाही असा आरोप शेतकऱ्यांनी केला आहे. (Orange farmers)
Babanrao Pacchpute । शेतकऱ्यांसाठी आमदार बबनराव पाचपुते करणार उपोषण
दरम्यान, कृषिमंत्री धनंजय मुंडे यांच्याकडे शेतकऱ्यांसाठी वेळ नाही. ते उपमुख्यमंत्री अजित पवार यांची सभा घेण्यात आणि त्यांचे स्वागत करण्यात खूप व्यस्त आहेत. मुंडेंनी संत्री बागेच्या नुकसानीची पाहणी करावी. या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई कधी मिळणार? असा संतप्त सवाल आता संत्री उत्पादक शेतकरी करू लागले आहेत.
चांदुर बाजार तालुक्यात मोठ्या प्रमाणावर संत्रीचे उत्पादन घेतले जाते. या भागातील शेतकऱ्यांनी पोटच्या लेकराप्रमाणे फळे वाढवली आहेत. परंतु आता फळगळीतीमुळे शेतकरीवर्ग कचाट्यात सापडला आहे. त्यांना खूप मोठा आर्थिक फटका बसला आहे. त्यामुळे शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी जोर धरू लागली आहे.
IMD Alert । पुढील महिन्याच्या सुरूवातीला पाऊस पडणार? जाणून घ्या पुणे हवामान खात्याचा अंदाज