आपल्या विचित्र फॅशन सेन्समुळे उर्फी जावेद (Uorfi Jawed) कायम चर्चेत असते. सोशल मीडियावर सुद्धा ती चांगलीच सक्रिय असते. सतत नवनवीन बोल्ड पोस्ट्स टाकून उर्फी आपल्या चाहत्यांना खुश ठेवत असते. खूपदा उर्फीला तिच्या कपड्यांवरून हटकले जाते. मात्र, ऐकेल ती उर्फी कसली ! अनेक मोठे वाद होऊन देखील उर्फीने आपला हेका आणि गजब फॅशन सेन्स सोडलेला नाही. मध्यंतरी उर्फी जावेदचा एक व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल ( Viral Video) होत होता. या व्हिडीओमध्ये विमानतळावर उर्फी आपल्या चाहत्यांकडे पैशांची मागणी करतात दिसते.
दरम्यान आता याच्या अगदी उलट व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होतोय. हा व्हिडीओ एका हॉटेल बाहेरचा असून यामध्ये उर्फी जावेद गरजू लोकांना ५०० च्या नोटा वाटत आहे. या व्हिडीओमध्ये उर्फी मुंबईच्या एका महागड्या हॉटेलमधून बाहेर पडताना दिसत आहे. यावेळी तिने लोकरीची शॉर्टस आणि क्रॉप टॉप घातला असून त्यावर ब्लेझर सुद्धा अडकवले आहे.
या हॉटेलमधून बाहेर पडत असताना, एक छोटा गरीब मुलगा उर्फीजवळ आला. या मुलाने तिच्याकडे पैशांची मागणी केली. यावेळी उर्फीने कसलीच तक्रार न करता त्या मुलाला ५०० ची नोट देऊन टाकली. त्यानंतर लगेच आणखी एक गरजू व्यक्ती उर्फीकडे आली आणि तिला पैसे मागू लागली. उर्फीने या व्यक्तीला देखील ५०० ची नोट दिली. उर्फीचा हा व्हिडीओ पाहून चाहत्यांनी विविध प्रतिक्रिया दिल्या आहेत. यामध्ये काहींनी उर्फीच्या वागण्याला पब्लिसिटी स्टंट म्हंटले आहे तर काहींनी चांगले मन!
Aakash Thosar | सैराटमधील परश्याने केला धक्कादायक खुलासा; म्हणाला, “फक्त गरजेपूरत…”