
महाराष्ट्रात शेतकरी (Farmers) आपल्या शेतीत नेहमी वेगवेगळ्या पिकांची लागवड करत असतात. दरम्यान या पिकातून मोठ्या प्रमाणात उत्पादन घेत असतात. अशातच पुणे (Pune) जिल्ह्यातील कासारी (ता. शिरुर) येथे एका परप्रांतियाने एक वेगळ्याच प्रकारची शेती केली आहे. या शेतकऱ्याने चक्क तामिळनाडू (Tamilnadu) येथील उत्पादित ब्लॅक शुगर किंग (Black Sugar King) या काळ्या ऊसाची सेंद्रीय पद्धतीने शेती केली आहे.
दरम्यान या शेतकऱ्याने ही काळ्या ऊसाची (sugarcane) शेती करुन अनोखा प्रयोग यशस्वी केला आहे. रामसिंग चितोडिया हे काही वर्षांपूर्वी राजस्थान येथून शिरूर तालुक्यातील कासारी येथील निमगाव म्हाळुंगी रोडलगत वास्तव्यास आले आहेत. दरम्यान त्यांनतर त्यांनी निमगाव म्हाळुंगी येथे एका ठिकाणी भाडेतत्वावर शेती घेऊन एक आगळीवेगळी शेती करण्याचा निर्णय घेतला. त्यांनतर रामसिंग चितोडिया यांनी त्या परिसरात कोठेही नसलेला आणि विशेष म्हणजे आयुर्वेदिक मानला जाणाऱ्या तामिळनाडू ब्लॅक शुगर किंग म्हणजे काळ्या उसाची शेती करण्याचे ठरवले.
दूध उत्पादकांसाठी दिलासादायक! गाई दूध दरात 3 आणि म्हैस दरात 2 रुपयांनी वाढ
महत्वाची बाब म्हणजे त्यांनी या लागवडीसाठी काळ्या ऊसाचे बेणे थेट तमिळनाडू येथून आणले आहे. त्यांनी या ऊसाची वीस गुंठे जमिनीत लागवड केली. विशेष म्हणजे या उसाची शेणखतात लागवड करुन नंतर पिकासाठी शेण, बेसन पीठ, गोमूत्र व दहीपासून जिवामृत बनवून पिकाला खत म्हणून वापरले. दरम्यान सध्या या ऊसाची चांगल्या प्रकारे वाढ झाली असून हा ऊस आजूबाजूच्या परिसरातच नाही तर संपूर्ण पुणे जिल्ह्यात चर्चेचा विषय बनू लागला आहे. त्यामुळे सध्या अनेकजण रामसिंग चितोडिया यांच्या शेतात भेट देऊन सेंद्रीय पद्धतीने पिकवलेल्या काळ्या उसाची पाहणी करीत आहे.
उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची मोठी घोषणा, ‘या’ तारखेला18 हजार पोलीस भरतीची जाहिरात निघणार
काळ्या उसाचे महत्वाचे फायदे
ब्लॅक शुगर किंग या काळ्या ऊसाचे खूप फायदे आहेत. विशेष म्हणजे या ऊसामुळे शरीरातील उष्णता कमी होते. तसेच शरीरातील रक्त पातळ होणे, कॅल्शियाम वाढणे यांसह अनेक आयुर्वेदिक फायदे आहेत. तसेच या काळ्या उसाला पुणे मुंबईसह शहरांच्या ठिकाणी बाजारपेठेत विशेष मागणी आहे.
आता मका पिकातील तण होणार नष्ट, ‘हे’ आहे नवीन तणनाशक जे ठरतंय रामबाण उपाय