दौंड (Daund) शहरामध्ये १० ते १५ जानेवारी दरम्यान जिल्हास्तरीय कृषी प्रदर्शनाचे (District level agricultural exhibition) आयोजन करण्यात आले आहे. याचे उद्घाटन भारतीय जनता पक्षाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांच्या हस्ते होणार आहे. या प्रदर्शनामध्ये शेतकऱ्यांना अनेक गोष्टी दाखवल्या जाणार आहेत.
बिग ब्रेकिंग! ‘गे’ जोडप्याला होणार मुल; ४ वर्षापूर्वी केले होते लग्न
या प्रदर्शनामध्ये विविध योजनांची माहिती, त्याचबरोबर महिला बचत गटाच्या उत्पादनांना व्यासपीठ मिळणार आहे. त्याचबरोबर या प्रदर्शनामध्ये कृषी यांत्रिकीकरण (Agricultural Mechanization), शेतीशी संबंधित, उत्पादक ते ग्राहक, खाद्यसंस्कृती, नर्सरी यासंदर्भातीलही स्टॉल उपलब्ध असणार आहेत.
भाजप किसान मोर्चाचे प्रदेशाध्यक्ष वासुदेव काळे (State President of BJP Kisan Morcha Vasudev Kale) यांनी याबाबत माहिती दिली आहे. या प्रदर्शनाचे आयोजन दौंड तालुका कृषी उत्पादक व प्रकिया सहकारी संस्था यांनी केले आहे, या कृषी प्रदर्शनाला दोन लाख शेतकरी भेट देणार असल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे.
धक्कादायक! दोन बसचा भीषण अपघात, 40 जागीच ठार तर 87 गंभीर जखमी