Agriculture News । अलीकडच्या काळात शेतकरी शेतीमध्ये वेगवेगळे प्रयोग करत आहेत. त्यांना प्रोत्साहन देण्यासाठी आता पीक स्पर्धा (Crop competition) राबवली जात आहे. याबाबत पुणे कृषी विभागाने माहिती दिली आहे. या स्पर्धेमध्ये 31 ऑगस्ट 2023 पर्यंत अर्ज करण्याचे आवाहन पुणे कृषी विभागाकडून करण्यात आले आहे. तसेच या स्पर्धेसाठी काही नियम आणि अटीदेखील ठेवण्यात आल्या आहेत. (Latest Marathi News)
दरम्यान कृषी विभागामार्फत सर्वसाधारण आणि आदिवासी गटासाठी भात, ज्वारी, बाजरी, तूर, मूग, उडीद, मका, नाचणी (रागी), सोयाबीन, भुईमुग आणि सूर्यफूल या पिकांसाठी पीक स्पर्धेचे तालुका स्तरावर आयोजन केले आहे. स्पर्धेतील शेतकऱ्यांची आलेली उत्पादकता आधारभूत धरुन राज्य, जिल्हा आणि तालुका स्तरावरील स्पर्धेसाठी विजेत्या शेतकऱ्यांची निवड केली जाणार आहे.
Eknath Shinde । मराठा आरक्षणासंदर्भात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची महत्वपूर्ण घोषणा
नियम आणि अटी
सर्वसाधारण गटासाठी 300 रुपये आणि आदिवासी गटासाठी 150 रुपये प्रमाणे प्रत्येक पिकासाठी स्वतंत्र प्रवेश शुल्क असेल. तसेच सहभागी शेतकऱ्याच्या नावावर जमीन असावी. ती जमीन त्याने कसावी. तसेच स्पर्धक शेतकऱ्याने एकाच वेळी एकापेक्षा जास्त पिकांसाठी स्पर्धेत भाग घेतला असेल तर त्यासंदर्भात माहिती कृषी विभागाच्या वतीने दिली आहे.
आवश्यक कागदपत्रे
- विहित नमुन्यातील अर्ज (प्रपत्र-अ)
- ठरवून दिलेले प्रवेश शुल्क भरल्याचे चलन
- 7/12, 8-अ चा उतारा
- आदिवासी असल्यास जात प्रमाणपत्र
- 7/12 वरील घोषित केलेल्या क्षेत्राचा चिन्हांकित केलेला नकाशा
- बँक खात्याच्या चेक/पासबुकच्या पहिल्या पानाची छायांकित प्रत
बक्षीस
तालुका पातळीवर प्रथम क्रमांकासाठी पाच हजार, द्वितीय तीन हजार आणि तृतीय क्रमांकासाठी दोन हजार रुपये, जिल्हा पातळीवर 10 हजार, सात हजार आणि पाच हजार रुपये तर राज्यपातळीवर प्रथम 50 हजार, द्वितीय 40 हजार तसेच तृतीय 30 हजार रुपये बक्षीस असेल.
Farmer News । मिरचीचं पीक वाचवण्यासाठी शेतकऱ्याचा केविलवाणा प्रयत्न, चक्क बाटलीने पाजले पाणी