पुणे येथील वैकुंठभाई मेहता राष्ट्रीय सहकारी व्यवस्थापन संस्थेत‘फलोत्पादन पिकांमधील मूल्यसाखळी वृद्धी-क्षमता व संधी’ या विषयावर आयोजित राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन करण्यात आले. यावेळी हे उद्घाटन केंद्रीय कृषी मंत्री नरेंद्र सिंह तोमर यांच्याहस्ते झाले. या कार्यक्रमावेळी वासुदेव नाना काळे (प्रदेशाध्यक्ष भाजप किसान मोर्चा) यांनी उपस्थित राहून मार्गदर्शन केले.
या कार्यक्रमावेळी राज्याचे कृषीमंत्री अब्दुल सत्तार, फलोत्पादन मंत्री संदिपान भुमरे, केंद्रीय कृषि आणि शेतकरी कल्याण विभागाचे सचिव मनोज आहुजा, अतिरिक्त सचिव डॉ.अभिलक्ष लिखी, राज्याच्या कृषि विभागाचे प्रधान सचिव एकनाथ डवले, केंद्रीय सहसचिव प्रिय रंजन, केंद्रीय फलोत्पादन आयुक्त प्रभात कुमार, राज्याचे कृषि आयुक्त धीरज कुमार इत्यादी उपस्थित होते.
महाराष्ट्रासाठी आनंदाची बातमी! आता अॅमेझाॅन कंपनीने ठाण्यात केली मोठी गुंतवणूक
या कार्यक्रमावेळी कृषी क्षेत्रामध्ये चांगली कामगिरी करणाऱ्या, अंकुश पडवळे (सोलापुर), रामनाथ बापू वाकचौरे (अहमदनगर), विलासराव शिंदे सह्याद्री ग्रुप (नाशिक) या प्रगतशिल शेतकरी व शेतमाल प्रक्रिया उद्योगातील उल्लेखनीय कार्याबद्दल पुरस्कारीत करण्यात आले. कृषि उत्पादक संस्था, मूल्य साखळी, बँक प्रतिनिधी, एसएचएम यांचा सत्कार करण्यात आला. त्याचबरोबर ‘ऑरगॅनिक पॅकेज ऑफ प्रॅक्टिस फॉर हॉर्टीकल्चर क्रॉप्स’ आणि ‘मिशन ऑरगॅनिक व्हॅल्यू चेन’ या पुस्तिकांचे आणि फलोत्पादन क्षेत्रातील यशकथांच्या संग्रहाचे प्रकाशन व आयोजित प्रदर्शनाचे उद्घाटन करण्यात केले.
पुण्यात घडली माणुसकीला काळीमा फासणारी घटना, चक्क म्हशीच्या रेडक्यावर केला अनैसर्गिक लैंगिक अत्याचार