सध्या भारतभर राहुल गांधी यांच्या ‘भारत जोडो’ यात्रेची चर्चा सुरू आहे. अगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर कॉंग्रेसने उचललेले हे एक मोठे व यशस्वी पाऊल आहे. दरम्यान काँग्रेसच्या अध्यक्षा सोनिया गांधी ( Soniya Gandhi’s Birthday) यांचा वाढदिवस जवळ येतोय. या वाढदिवसानिमित्त पुण्यात विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे.
ऊसाचे पाचट न जाळता तयार करा सेंद्रिय खत; ‘असा’ होतो फायदा
2 ते 9 डिसेंबर या कालावधीत पुण्यामध्ये सेवा, कर्तव्य, त्याग सप्ताह साजरा करण्यात येणार आहे. यामध्ये विविध उपक्रमांचे आयोजन करण्यात आले आहे. या सप्ताहाचे उद्घाटन ‘एक पाऊल विश्वासाचे’ या उपक्रमाने होणार असून हा कार्यक्रम आज (दि. 2) सायंकाळी 5 वाजता पार पडणार आहे. एस.एम.जोशी सभागृहात होणाऱ्या या कार्यक्रमासाठी माजी मंत्री जितेंद्र आव्हाड उपस्थित राहणार आहेत.
नाद करा पण आमचा कुठं! शेतकऱ्याने दूध आणि शेणातून बांधला एक कोटीचा बंगला
सोनिया गांधी यांच्या वाढदिवसानिमित्त 2004 पासून हा सप्ताह साजरा केला जातो. यंदाचा सप्ताह हा 18 वा सप्ताह असणार आहे. या सप्ताहामध्ये 7 ते 9 डिसेंबर दरम्यान राहुल गांधी ( Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो यात्रेतील निवडक क्षणांचे प्रदर्शन भरविण्यात येणार आहे. तसेच 6 डिसेंबर रोजी महानिर्वाण दिनानिमित्त ‘राज्यघटनेचे संरक्षण आवश्यक’ या विषयावर व्याख्यान देखील होणार आहे.
थेट जर्मनीहून कांदे लावण्यासाठी महिला आली भारतात; पाहा VIDEO
या सप्ताहामध्ये महिलांसाठी विशेष उपक्रम घेण्यात येणार आहेत. यामध्ये पुना हॉस्पिटलमध्ये महिला पत्रकारांसाठी मोफत आरोग्य तपासणी शिबीर, सफाई कर्मचाऱ्यांना साडी वाटप, सुकन्या समृद्धी योजना कार्ड वाटप, स्त्री-पुरुष समानता विषयावर चर्चा, महिलांसाठी रोजगार मेळावा या उपक्रमांचा समावेश आहे. याशिवाय सप्ताहादरम्यान तृतीयपंथियांसाठी देखील विशेष कार्यक्रम घेण्यात येणार आहेत.