
काल पुणे येथे झालेल्या कार्यक्रमात सुप्रिया सुळे यांच्या साडीला आग लागली होती. सुदैवाने त्यावेळी प्रसंगावधान राखल्याने त्या थोडक्यात बचावल्या. दरम्यान सुप्रिया सुळे ( Supriya Sule) यांचे बंधू व विरोधी पक्षनेते अजित पवार ( Ajit Pawar) यांनी देखील काल बारामती येथील सभेत एका धक्कादायक घटनेची माहिती दिली आहे. शनिवारी ( दि.14) पुणे येथे असताना अजित पवार यांच्यावर देखील कठीण प्रसंग ओढावला होता.
मोठी बातमी! विमान दुर्घटनेत ‘या’ प्रसिद्ध गायिकेचं निधन
एका हॉस्पिटलची पाहणी करताना हा प्रसंग घडला आहे. हॉस्पिटलचे उद्घाटन झाल्यानंतर अजित पवार चौथ्या मजल्यावर लिफ्टने जात होते. यावेळी अचानक लिफ्ट बंद झाली. लिफ्ट मधील लाईट गेली आणि चौथ्या मजल्यावरून लिफ्ट थेट खाली कोसळली. असे सांगत अजित पवार यांनी या भयानक प्रसंगाचे वर्णन केले.
‘या’ कारणामुळे महाराष्ट्र केसरीच्या अंतिम सामन्यासाठी शरद पवार अनुपस्थित
“थोडक्यात बचावलो नाहीतर आज श्रद्धांजलीचा कार्यक्रम घ्यावा लागला असता.” असे ते यावेळी म्हणाले. आदल्या दिवशी अजित पवार यांच्या जीवावर बेतलेला प्रसंग व लगेच दुसऱ्या दिवशी सुप्रिया सुळे यांच्या साडीला लागलेली आग यामुळे राजकीय वर्तुळात चांगलीच खळबळ माजली आहे. तर राष्ट्रवादी काँग्रेसच्या समर्थकांमध्ये चिंतेचे वातावरण आहे.
“अन् त्याने चक्क गुटखा थुंकण्यासाठी उघडायला लावली विमानाची खिडकी”; पाहा VIDEO