मागच्या काही दिवसांपासून महाराष्ट्र-कर्नाटक (Maharashtra-Karnataka) सीमावाद चालू आहे. मात्र आता हा वाद आणखी चिघळला आहे. बेळगावजवळ हिरेबागवाडी कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांकडून महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक करण्यात आली आहे. आता या प्रकरणावरून अनेक राजकीय नेते प्रतिक्रिया देत आहेत. यामध्येच आता संभाजीराजे छत्रपती यांनी कर्नाटक सरकारला इशारा दिला आहे.
“येत्या ४८ तासांत हे प्रकरण संपलं नाही तर…”, शरद पवारांचा कर्नाटक सरकारला गंभीर इशारा
संभाजीराजे छत्रपती यांनी याबाबत एक ट्विट केले आहे. यामध्ये त्यांनी प्रतिक्रिया नोंदवताना शिवारायांचा उल्लेख केला आहे. त्यांनी ट्विटमध्ये लिहिले की, “छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल”.
ग्रामीण भागात पुन्हा एकदा PMPL धावणार – आमदार राहुल दादा कुल
छत्रपती शिवरायांचे चित्र असलेल्या वाहनांची कन्नडीगांनी केलेली तोडफोड निषेधार्ह असून महाराष्ट्रात त्यांना जशास तसे उत्तर दिले जाईल. रेणुकादेवी यात्रेनिमित्त कोल्हापूरातील लाखो भाविक सौंदत्ती येथे आहेत,त्यांची सुरक्षा कर्नाटक सरकारने करावी अन्यथा वेळप्रसंगी मला कर्नाटकात यावे लागेल
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) December 6, 2022
दरम्यान, कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या सहा ट्रकवर दगडफेक केली आहे. यामुळे तेथील टोलनाक्यावर वातावरण चिघळलं असून घटनास्थळी पोलीस दाखल झाले आहेत. कन्नड रक्षण वेदिकेचे नेते नारायण गौडा आहेत. त्यांना पोलिसांनी त्यांना हा दौरा करण्यास मनाई केली होती तरी देखील ते बेळगावच्या दिशेने आले. त्यामुळे हिरेबागवाडी येथील टोलनाक्यावर पोलिसांनी त्यांना रोखलं. यावेळी संतापलेल्या कन्नड रक्षण वेदिकेच्या कार्यकर्त्यांनी महाराष्ट्राच्या वाहनांवर दगडफेक केल्याची माहिती समोर आली आहे.
कर्नाटक वादावर शरद पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया; म्हणाले…