Site icon e लोकहित | Marathi News

Udayanraje Bhosale: “…नाहीतर वाडगं घेवून बसायला लागेल”, कृषी प्रदर्शनाच्या कार्यक्रमात उदयनराजे भोसलेंनी व्यक्त केले मत

"...otherwise we will have to sit down with bowls", opined Udayanraje Bhosle at the Agricultural Exhibition.

मुंबई : खासदार उदयनराजे भोसले (Udayanraje Bhosale) हे नेहमी त्यांच्या स्टाइल आणि हटके वक्तव्यांमुळे चर्चेत असतात. उदयनराजे भोसले नेहमी आपल्या भाषणातून (speech ) कार्यकर्त्यांना, अधिकाऱ्यांना दम भरत असतात. दरम्यान नुकतच खासदार उदयनराजे हे कृषी प्रदर्शनाच्या (Agricultural Exhibition) उद्घाटनीय कार्यक्रमात उपस्थित होते. या कार्यक्रमात त्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्या गोष्टी केल्या. यावेळी उदयनराजे म्हणाले, “मी तळमळीनं का बोललो.याच कारण म्हणजे माझं बोलण शेतकऱ्यांपर्यंत पोहचलं पाहिजे. मीडियाला मला काय फार मोठं आहे असं दाखवायचं नाही. कोणीचं बोललं नाही म्हणून मी बोललो.”

कुत्र्याचा पाठलाग करत बिबट्या घुसला घरात; पण शेतकऱ्याने केला जेरबंद

पुढे उदयनराजे म्हणाले की ,”टीआरपी कशामुळं आहे. तर, मी लोकांचे प्रश्न घेऊन मीडियासमोर (Media) जातो. लोकं म्हणतात, मी कॉलर का उडवतो.पण करेक्ट आहे म्हणून.. लोकांचे प्रश्न मी मनापासून मांडतो. हे माझं भाषण नाही तर माझं मनापासूनचं बोलणं आहे, असं त्यांनी स्पष्ट सांगितलं.

Asaduddin Owaisi: “सर्वात जास्त कंडोम तर…” मोहन भागवतांच्या ‘त्या’ विधानावर ओवैसींचं प्रत्युत्तर; म्हणाले…

” लोक स्वतःच्या हातात सत्ता घेतील. पण प्रशासनाला ओळखत नाही अशी परिस्थिती होवू देवू नका. नाहीतर पुढं सोमालिया सारखी अवस्था होईल. आण मग काय देशाचे तुकडे व्हायला वेळ लागणार नाही. कारण आज आपण खुर्चीत बसतोय, पण उद्या वाडगं घेवून बसायला लागेल.” दरम्यान हे सांगताना उदयनराजे हे स्टेज वरून खाली उतरून खाली मांडी घालून बसून बसले. उदयनराजे यांनी भाषणात वाडगं घेऊन कसं बसायचं हेही दाखवलं. पुढे ते म्हणाले की, लोकांचं कल्याण झालं पाहिजे, अशीच माझी अपेक्षा आहे.

शेतकऱ्यांसाठी सुवर्णसंधी! दुग्धव्यवसाय सुरू करण्यासाठी आता सरकार देतय ‘इतकं’ अनुदान

Spread the love
Exit mobile version