मुंबई : राज्यात शिवसेनेत झालेल्या बंडखोरीनंतर खरी शिवसेना कोणाची यावरुन उद्धव ठाकरे आणि शिंदे गटात संघर्ष सुरू आहे. दरम्यान अशातच शिवाजी पार्क मैदानात दसरा मेळावा कोण घेणार यावरून उद्धव ठाकरे आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात वाद सुरू झाला आहे.
Urvashi-Rishabh: उर्वशी रौतेला आणि ऋषभ पंतमधील वादाला फुटले तोंड, पोस्ट चर्चेत
मेळाव्यासाठी शिवसेनेने केला अर्ज
दसरा मेळाव्याला मुंबई महापालिकेकडून परवानगी मिळावी यासाठी शिवसेनेने अर्ज दाखल केला आहे. मात्र, अद्याप शिवसेनेला परवानगी मिळालेली नाही. दरम्यान अशातच शिवसेनेचा दसरा मेळावा शिंदे गटाकडून हायजॅक करण्याचा प्रयत्न सुरू झालाय अस आरोप शिवसेनेकडून करण्यात येत आहे. त्यामुळे यंदा शिवसेनेचा दसरा मेळावा होणार का याकडे सगळ्यांच लक्ष लागलं आहे.अशातच आता शिवसेना आमदार भास्कर जाधव यांनी शिंदे गटाला इशारा दिला आहे.
शिवसेना आग आहे तिच्या नादी लागू नका…
“शिवसेना हा धगधगता निखारा पक्ष आहे. अंगारा आहे आण कुणीही शिवसेनेच्या नादाला लागून आपल्या राजकीय भवितव्याची राख रांगोळी करुन घेऊ नये.जो कुणी लागेल त्याची राजकीय राख रांगोळी झाल्याशिवाय राहणार नाही त्यामुळे कुणीही असा प्रयत्न करु नये”, असा सल्ला जाधवांनी शिंदे गटाला दिला आहे.तसेच पुढे भास्कर जाधव म्हणाले की, या देशामध्ये ज्याप्रमाणे शिवसेनेची एक विचार, एक धोरण, एक झेंडा, एक भूमिका आहे. दसरऱ्याच्या दिवशी शिवतीर्थावर गेली ५६ वर्ष मेळावा घेऊन गिनीज बूक ऑफ वर्ल्डमध्ये नोंद करणारा शिवसेना हा एकमेव पक्ष आहे.
IND vs PAK: आजचा भारत पाकिस्तान सामना कोहलीसाठी ‘असा’ ठरेल खास, कारण..
भारतासाठी अभिमानाची गोष्ट
“गेली ५६ वर्ष एकाच मैदानावर एकाच दिवशी शिवसेनेकडून दसरा मेळावा घेतला जातो ही भारतासाठी अभिमानाची गोष्ट आहे.बाळासाहेब ठाकरे यांनी १९ जून १९६६ साली शिवसेना पक्षाची स्थापना केली. विशेष म्हणजे शिवसेना प्रमुखांनी शिवसेनेचा ध्वज भगवाच ठेवला आहे.शिवसेनेची निशाणी धनुष्यबाण आहे. शिवसेनेनं मराठी माणूस आणि हिंदुत्वाचा विचार यामध्ये कधीही भेदभाव केला नाही. ” असल्याचेही भास्कर जाधव म्हणाले.
Nitin Gadkari: “मी विहिरीत उडी मारुन मरुन जाईन, पण काँग्रेसमध्ये जाणार नाही” – नितीन गडकरी