मुंबई : महापालिका निवडणुका तोंडावर आल्या आहेत.दरम्यान या निवडणुकांसाठी सर्वच पक्ष सज्ज झाले आहेत. तसेच राज ठाकरे यांनी सर्व पालिकांच्या निवडणूक लढवण्यासाठी तयारीला लागण्याचे आदेश दिल्याची माहिती संदीप देशपांडे यांनी दिली आहे. दरम्यान मागील काही दिवसांपूर्वी भाजपा नेते राज ठाकरेंची भेट घेत असल्याने महापालिकेच्या सर्व जागा लढवण्यासाठी मनसे आणि भाजपा एकत्र येणार असल्याची चर्चा सुरू आहे. आज मुंबईत माणसे पक्षाची अंतर्गत बैठक होती.
Narendra Modi: पंतप्रधान नरेंद्र मोदींची मोठी घोषणा! लम्पी रोगावर स्वदेशी लस विकसीत होणार
या बैठकीनंतर संदीप देशपांडे यांना शिंदे गटासोबत युती करणार का? असं विचारण्यात आला होता. यावर देशपांडे म्हणाले की “ही पक्षाची अंतर्गत विषयासंबंधी बैठक होती. तिथे काय चर्चा झाली हे माध्यमांसमोर सांगू शकत नाही. “आमच्या पक्षाचे निर्णय राज ठाकरे घेतात, भाजपा घेत नाही. राज ठाकरेंनी दिलेल्या आदेशानुसार सर्व जागा लढवण्याची तयारी सर्व पदाधिकारी, शाखा अध्यक्ष करत आहेत” असं त्यांनी सांगितलं.पुढे ते म्हणाले “याआधीही , २०१२, २०१७ मध्ये आम्ही सर्व ताकदीने सर्व जागा लढवल्या होत्या. त्याचप्रमाणे यावेळीही २२७ जागा लढवण्याच्या तयारीत आम्ही आहोत. दरम्यान याबाबत राज ठाकरेंकडून वेळोवेळी आदेश येत आहेत”.
सध्या आगामी येणाऱ्या मुंबई महापालिका निवडणुकीसाठी भाजपाने मनसेशी उघड युती न करता छुपे सहकार्य करण्याचा निर्णय घेतला असल्याची माहिती आहे. त्यानुसार, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे गटासाठी ८०-९० जागा सोडण्याचा भाजपचा प्रस्ताव असून, त्यांनी मनसेशी युती करून त्यांना आपल्या वाटय़ातील जागा द्याव्यात, असा भाजपाचा विचार आहे. न्यायालयीन लढाईत चित्र स्पष्ट झाल्यानंतर योग्य वेळी याबाबत अंतिम निर्णय घेण्यात येणार असल्याचे समजतं.
मनसेची थेट भाजपाची युती करण्याची तयारी नाही. शिवसेनेची मराठी मतपेढी फोडण्यासाठी मनसेचा वापर करावा, अशी भाजपची रणनीती आहे.भाजपाने शिंदे गटाबरोबर युती करून निवडणूक लढविण्याचे जाहीर केलं आहे.मनसेशी वेगळी युती करून त्यांना जागा सोडणे भाजपाला शक्य नसल्याने छुप्या सहकार्याची रणनीती आखण्यात आली आहे.म्हणून शिंदे गटाशी युती म्हणून त्यांना ८०-९० जागा सोडायच्या आणि प्रभागांमधील ताकदीनुसार शिंदे गटाने त्यामधून मनसेच्या उमेदवारांसाठी जागा सोडायच्या, असे तूर्त ठरविण्यात आलं आहे.तसेच मनसेकडे अनेक जागांवर चांगले उमेदवार नसले तरी शिवसेनेच्या मराठी मतांचे विभाजन करण्यासाठी भाजपा त्यांचा वापर करण्याचे संकेत आहेत.
भारतीय स्टेट बँकेमध्ये लिपिक पदाच्या ५००८ जागांची होणार भरती, असा करा अर्ज