सोशल मीडियावर (Social Media) दररोज अनेक वेगेवेगळे व्हिडीओ व्हायरल होत असतात. काही व्हिडीओ गमतीशीर असतात तर काही व्हिडीओ आपल्याला थक्क करणारे असतात. सध्या देखील सोशल मीडियावर एक व्हिडीओ जोरदार व्हायरल होत आहे. या व्हायरल झालेल्या व्हिडिओमध्ये तुम्ही पाहू शकता की, सार्वजनिक बसमध्ये (Bus Viral Video )एक तरुणी एका व्यक्तीला मारत आहे. (women video viral)
मिळालेल्या माहितीनुसार, त्या व्यक्तीने महिलेला नको त्या जागी स्पर्श केला होता. यावेळी महिलेने त्याला समजून देखील सांगितले होते मात्र तरीदेखील त्याचे अश्लील चाळे थांबत नसल्याने अखेर महिलेने त्या व्यक्तीला मारायला सुरवात केली. कर्नाटकातील मंड्यामधील एका महिलेसोबत बसमधून प्रवास करताना एका व्यक्तीने गैरवर्तन केलं.
भर लग्नमंडपात आधीची पत्नी आली अन् घातला गोंधळ; पुढं घडलं असं काही वाचून तुम्हालाही बसेल धक्का
तो व्यक्ती तरुणीला वारंवार नको त्या जागी स्पर्श करत होता. महिलेने वारंवार इशारा देऊन देखील त्या व्यक्तीने अश्लील चाळे बंद केले नाहीत. यांनतर महिलेने कसलाच विचार न करता त्या व्यक्तीला मारायला सुरवात केली. यावेळी बसमधील उपस्थित लोकांनी याचा व्हिडीओ देखील काढला. सध्या हा व्हिडीओ सोशल मीडियावर तुफान व्हायरल होत आहे.
दिल्लीत गँगवार! चार जणांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या…”
A woman beat her eve teaser at KR Pete bus stand in #Mandya. The lady was travelling in the local bus – the unidentified man was teasing her and tried to touch her inappropriately. Even after she warned- he continued to touch her (1/2) pic.twitter.com/69wEWFuTgZ
— Imran Khan (@KeypadGuerilla) June 3, 2023