
सध्या महाराष्ट्रामध्ये देखील अनेक धक्कादायक घटना घडत आहेत. रोज कुठे ना कुठे हत्या होतच आहेत. सध्या लातूरमध्ये एक धक्कादायक घटना घडली आहे. याबाबत राष्ट्रवादी काँग्रेसचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी ट्विटरवर ट्विट करत माहिती दिली आहे.
दिल्लीत गँगवार! चार जणांवर गोळीबार, जखमी तरुणांची आई म्हणाली, “माझ्या…”
जितेंद्र आव्हाड यांनी ट्विट करत लिहिले की, मन सुन्न झालंय… तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड…लातूर रेणापूर येथे अतिशय संतापजनक घटना घडली आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10% टक्याने व्याजाने घेतले. तीन हजारांच्या बदल्यात 20 हजार रुपये वसूल केले तरीही आणखी पैसे बाकीच आहे म्हणत भर बाजारात काठीने मारहाण केली.
अमृता फडणवीस धमकी प्रकरणी समोर आली धक्कादायक माहिती! शरद पवारांसह ‘या’ बड्या नेत्यांची नावे चर्चेत
तबकाले रेणापूर पोलीस स्टेशनला गेला नेहमी प्रमाणे दलित असलेल्या पीडिताची तक्रार घेतली नाही उलट बाँडवर जखमी पीडिताचा जबाब घेऊन प्रकरण दडपून टाकले. हाताला गंभीर मार लागल्यामुळे तो हॉस्पिटलला गेला, पोलिसांनी कार्यवाही केली नाही त्यामुळे आरोपीचे बळ वाढले. दुसऱ्या दिवशी सकाळी गिरिरत्न तबकाले याच्या घरी त्याने सकाळी 6 वाजताच हल्ला चडवला. हल्ला अतिशय क्रूरपणे केला, आरोपी अन् त्याचा भाचा या दोघांनी मिरची पावडर डोळ्यात टाकून रॉडने हल्ला केला या हल्ल्यात मातंग बांधव मृत्यूमुखी पडला.
कोण आहे अभिषेक पर्वते? एका अपघाताने जीवनच पालटले; आता ‘या’ व्यवसायांचा आहे मालक!
दलित आहे आमचं काय करणार या मानसिकतेतून त्याची आर्थिक लुटमार केली आणि मस्ताडलेल्या हरामीने जणू पोलीस यंत्रणा खिश्यात घातली या मानसिकतेतून ही हत्या केली. राज्यात दलित सुरक्षीत नाहीत, नांदेडची घटना ताजी असताना ही अतिशय क्रूर घटना समोर आली जाहीर निषेध करत असून राज्य सरकारला प्रश्न विचारत आहे की मातंग समाजाचे हे हत्याकांड तुम्ही गंभीर घेणार आहेत की नाही? असे ट्विट जितेंद्र आव्हाड यांनी केले आहे.
मन सुन्न झालंय…
— Dr.Jitendra Awhad (@Awhadspeaks) June 6, 2023
तीन हजार रुपयांसाठी गुंड सावकाराने मातंग बांधवाच्या डोळ्यात मिरची टाकून रॉडने मारत घडवले हत्याकांड…#लातूर रेणापूर : अतिशय संतापजनक घटना आहे. मानवतेला काळीमा फासणारी ही घटना आहे. गिरीरत्न तबकाले या मातंग गरीब बांधवाने गावातील सावकाराकडून तीन हजार रुपये 10%…