पुणे: येथील युनिक स्किल डेव्हलपमेन्ट सेंटर येथे विशवस्त संस्था तथा धर्मादाय संस्था यांनी भरावायाच्या फॉर्म १०A सबंधीचा ‘आऊटरिच प्रोग्रॅम’ पुणे आयकर आयुक्त कार्यालयाच्या वतीने आयोजित करण्यात आला होता.
‘या’ यात्रेत विकला ५० लाखांचा बकरा; कारण ऐकुण व्हाल थक्क
विशवस्त संस्था आणी धर्मदाय संस्था यांनी भरावयाच्या फॉर्म १०A संदर्भात आयकर विभागाची शिखर संस्था, म्हणजेच केंद्रीय प्रत्यक्ष कर मंडळ (सी.बी.डी.टी) यांनी करदात्यांना होणारा त्रास लक्षात घेऊन, सदर फॉर्म १०A संदर्भातील ‘कोंडोनेशन ऑफ डिले’ फॉर्म भरण्याची मुदत २५/११/२०२२ पर्यंत वाढवलेली आहे. याच पार्शवभूमीवर माहितीची देवाणघेवाण करण्यासाठी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला.
आदित्य ठाकरेंनी थेट जेजुरीत जाऊन भंडारा उधळला; कार्यकर्त्यांनी केले जंगी स्वागत
या कार्यक्रमावेळी आयकर उपायुक्त, श्री. प्रितमकुमार तुरेराव, आयकर अधिकारी श्री.चंद्रशेखर कळंबे आणी आयकर अधिकारी निरज कुमार निशेष यांनी यावेळी मार्गदर्शन केले.
“..अरे, ही तर पापा की परी”, मॅडमचे ड्रायव्हिंग स्किल्स पाहून तुम्हीही व्हाल थक्क! पाहा VIDEO
उपस्थित सर्व आयकर विभागातील अधिकाऱ्यांनी फॉर्म १०A, लेखा परिक्षण अहवाल, आयकर विवरणपत्र दाखल करणे या विषयासंदर्भात माहिती दिली. या कार्यक्रमावेळी सूत्रसंचालन युनिक स्किल डेव्हलपमेन्ट सेंटर या संस्थेचे ट्रस्टी श्री. बाळासाहेब झरेकर यांनी केले व आभार श्री. विजय कुलकर्णी यांनी मानले. या कार्यक्रमासाठी अनेक CA, Accountants, विद्यार्थी त्याचबरोबर सामान्य नागरिक देखील उपस्थित होते.