
सध्या एक धक्कदायक घटना समोर आली आहे. कोल्हापूर राधानगरी रोडवर (Kolhapur Radhanagari Road) कोल्ड्रिंक्स घेऊन जाणारा कंटेनर (container) पलटी झाल्याची माहिती समोर आली आहे. पलटी झालेल्या कंटेनरमध्ये वेगेवेगळे कोल्ड्रिंक्स (Cold drinks) असल्याची माहिती समोर येत आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, अपघात शनिवारी पहाटे झाला असून या अपघातामध्ये दोन जण गंभीर जखमी झाले आहेत. हा कंटेनर पलटी होताच तेथील स्थानिक नागरिकांनी आणि वाहन चालकांनी कोल्ड्रिंक्सने भरलेले बॉक्स नेण्यासाठी त्या ठिकाणी चांगलीच गर्दी केल्याचे चित्र पाहायला मिळत आहे.
मोठी बातमी! नाशिकच्या गोल्डमॅनला 22 कोटींच्या आर्थिक घोटाळ्याखाली अटक
या अपघातात ड्रायव्हर आणि त्याचा सोबती किन्नर चांगलेच जखमी झाले आहेत. आता त्यांच्यावर रुग्णालयामध्ये उपचार सुरु आहे. आता अपघाताबाबत पोलीस ठाण्यामध्ये नोंद देखील दाखल झाली आहे.