Site icon e लोकहित | Marathi News

Success Story । दुध विकून सालगडी झाला 5 एकरचा मालक, वाचा प्रेरणादायी प्रवास

Owner of 5 acres became rich by selling milk, read inspiring journey

Success Story । नांदेड : भारतीय अर्थव्यवस्थेत शेतीचा (Agriculture) मोठा वाटा आहे. अनेकजण शेतीसोबत व्यवसाय करतात. ज्यामुळे शेतकऱ्यांना लाखो रुपयांचा नफा होतो. अनेकजण शेतीसोबत दुधाचा व्यवसाय (Milk business) करतात. या व्यवसायातून त्यांना लाखोंची कमाई करता येत आहे. त्यामुळे त्यांचे नशीब बदलत आहे. सध्या असे एक गाव आहे ज्यांचा मुख्य व्यवसाय हा दुध व्यवसाय आहे. विशेष म्हणजे या गावातील सालगडी असणाऱ्या एका शेतकऱ्याने व्यवसायाच्या जोरावर 5 एकर जमीन खरेदी केली आहे. (Latest Marathi News)

Shiv Thackeray । शिव ठाकरेनं जुहू बीचवर केली साफसफाई, पाहा व्हिडीओ व्हिडीओ

नांदेड जिल्ह्यातील हिमायतनगर तालुक्यातील बोरगडी गावातील हनमंतू गोपूवाड असे या शेतकऱ्याचे नाव आहे. त्यांनी 20 वर्षापूर्वी एक म्हैस विकत घेऊन हा व्यवसाय सुरू केला आहे. सर्वात महत्त्वाचे म्हणजे आज त्यांच्याकडे एकूण 10 म्हशी आहेत. त्यापैकी 6 म्हशी दुभत्या असून त्या दिवसातून दिन वेळा 50 लिटर दूध देतात. या दुधाची विक्री करून त्यांना दररोज अडीच ते तीन हजार रुपये मिळतात.

Asia Cup 2023 । आशिया चषकापूर्वीच संघाला मोठा धक्का! वेगवान गोलंदाज बाहेर

कमाई

हनुमंतू गोपूवाड हे सुरुवातीला शेतात सालगडी म्हणून काम करत होते. काम करत असताना त्यांना या व्यवसायाला सुरुवात केली. कमाईचा विचार केला तर आज ते महिन्याला जवळपास खर्च वजा करून एक लाख रुपये कमावत आहेत.

सातबारा उताऱ्यातील चूक दुरुस्त करायचीय? फॉलो करा ही सोपी पद्धत, घरबसल्या मिनिटात होईल काम

त्यांचा हा प्रेरणादायी प्रवास पाहता संपूर्ण गावाने दुधाचा व्यवसाय करण्यास सुरुवात केली आहे. विशेषतः तरुण शेतकरी सरकारी नोकरी न करता या दुधाच्या व्यवसायाकडे वळले आहेत. त्यातून त्यांना लाखो रुपयांची कमाई करता येत आहे. हनुमंतू गोपूवाड यांनी शेतकऱ्यांनी शेती सोबत दुधाचा व्यवसाय करावा असा मोलाचा सल्ला दिला आहे.

Chandrayaan 3 Live Streaming । चांद्रयान-3 लँडिंग किती वाजता होईल? ‘या’ ठिकाणी पाहता येणार थेट प्रक्षेपण

हे ही पहा

Spread the love
Exit mobile version