
अगामी विधानसभा निवडणूकांच्या पार्श्वभूमीवर सर्वच पक्षांनी मोर्चेबांधणी सुरू केली आहे. कुठल्या मतदारसंघात कोण उभे राहणार इथपासून ते कुठले डावपेच टाकायचे अशी धावपळ सगळीकडे सुरू आहे. अशातच भाजप आमदार गोपीचंद पडळकर यांनी बारामती येथे झालेल्या बैठकीबाबतीत मोठा खुलासा केला आहे. 2024 च्या निवडणूकीमध्ये खानापूर – आटपाडी मतदारसंघातून शिंदे गटाचे आमदार अनिल बाबर निवडणूक लढवणार नाहीत अशी माहिती त्यांनी दिली आहे.
शिंदे-फडणवीस सरकारकडून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांसाठी कोटींची तरतूद; अधिवेशनात घेतला ‘हा’ निर्णय
खानापूर येथील मोही गावातील कार्यक्रमामध्ये गोपीचंद पडळकर ( Gopichand Padalkar) बोलत होते. यावेळी त्यांनी अगामी विधानसभा निवडणुकीत खानापूर- आटपाडी मतदारसंघातून भाजपचा उमेदवार कोण असणार याबाबत गौप्यस्फोट केला आहे. या मतदारसंघात शिंदे गटाचे आमदार निवडणूक लढवणार नाहीत असे सांगून अप्रत्यक्षपणे त्यांनी भाजपकडून आपली उमेदवारी जाहीर केली आहे.
2019 मध्ये अनिल बाबर ( Anil Babar) यांनी फक्त नि फक्त उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या आदेशामुळे आमदार झाले होते. यावेळी गोपीचंद पडळकर बारामती मतदारसंघातून निवडणूक लढवत होते. दरम्यान अनिल बाबर व त्यांचे जेष्ठ पुत्र अमोल बाबर बारामती क्लब हाऊसला गोपीचंद पडळकर यांना भेटायला आले होते. यावेळी त्यांनी पडळकरांना शब्द दिला होता की, ही आमची शेवटची निवडणूक आहे. अशी माहिती खुद्द गोपीचंद पडळकर यांनी दिली आहे.