Politics News । काल काँग्रेस नेते राहुल गांधी (Rahul Gandhi) यांच्या भारत जोडो न्याय यात्रेने महाराष्ट्रात प्रवेश केला. राहुल गांधींची यात्रा नंदुरबारमध्ये प्रवेश करत असतानाच राहुल गांधींना लोकसभा निवडणुकीपूर्वी (Lok Sabha Elections) मोठा धक्का बसला आहे. पक्षातील बडा नेता आज भाजपमध्ये (BJP) प्रवेश करणार आहे. याचा फटका काँग्रेसला आगामी निवडणुकीत बसेल. (Latest marathi news)
माजी मंत्री पद्माकर वळवी (Padmakar Valvi) यांनी काँग्रेसला (Congress) रामराम ठोकला आहे. आज ते भाजपमध्ये प्रवेश करणार आहेत. कालच त्यांनी प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे (Chandrasekhar Bawankule) यांची या संदर्भात भेट घेतली. लोकसभा निवडणुकीच्या तोंडावर काँग्रेससाठी हा सर्वात मोठा धक्का मानला जात आहे. नंदुरबारमध्ये वळवी यांचा मोठा दबदबा आहे.
Manoj Jarange Patil । “फडणवीस यांच्या डोक्याला…” नेमकं काय बोलले जरांगे पाटील?
पद्माकर वळवी हे नंदुरबारमधील काँग्रेसचे ब़डे नेते असून त्यांनी महाराष्ट्र राज्याचे खेळ मंत्री तथा नंदुरबार जिल्हाचे पालकमंत्री म्हणून काम पाहिले आहे. सध्या त्यांची मुलगी सिमा वळवी या देखील राजकारणात सक्रिय झाल्या आहेत. त्या जिल्हा परिषदेवर कार्यरत आहेत. लोकसभा निवडणुकीपूर्वी महाविकास आघाडीला सतत धक्क्यांवर धक्के बसत आहेत.