
Pahalgam Terror Attack । जम्मू-कश्मीरच्या अनंतनाग जिल्ह्यातील पहलगाम येथे पर्यटकांवर झालेल्या भ्याड दहशतवादी हल्ल्याने संपूर्ण देश हादरला आहे. लष्करी गणवेशात आलेल्या अतिरेक्यांनी थेट निष्पाप पर्यटकांवर गोळीबार केला आणि या हल्ल्यात २८ लोकांचा दुर्दैवी मृत्यू झाला. हल्ल्याची तीव्रता पाहता देशभरात संतापाचे वातावरण निर्माण झाले आहे.
Cashless Treatment l अपघातग्रस्त रुग्णांसाठी राज्य सरकारकडून दिलासा – कॅशलेस उपचार योजनेची घोषणा
या घटनेनंतर राजधानी दिल्लीत सुरक्षा व्यवस्थेबाबत उच्चस्तरीय बैठका सुरू झाल्या आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपला विदेश दौरा अर्धवट सोडून भारतात परत येताच, विमानतळावरच तातडीची बैठक घेतली. या बैठकीत त्यांनी परिस्थितीचा आढावा घेतला आणि लष्कर व सुरक्षा यंत्रणांना सज्ज राहण्याचे निर्देश दिले.
दिल्लीत संरक्षण मंत्रालयात झालेल्या बैठकीत तिन्ही सैन्य दलांचे प्रमुख उपस्थित होते. या बैठकीत हल्ल्याला योग्य प्रत्युत्तर देण्यासाठी विविध पर्यायांवर चर्चा करण्यात आली. या शिफारसी पुढील केंद्रीय सुरक्षा समितीच्या बैठकीत मांडल्या जाणार आहेत.
Politics News । राजकारणातून सर्वात मोठी बातमी! शरद पवार आणि अजित पवार यांच्यात बैठक
गृहमंत्री अमित शाह यांनीही तत्काळ जम्मू-कश्मीरचा दौरा करून परिस्थितीची पाहणी केली. ते आज संध्याकाळी दिल्लीत होणाऱ्या मंत्रिमंडळाच्या बैठकीस हजर राहणार असल्याचे संकेत आहेत. दरम्यान, भारताच्या तिन्ही सैन्य दलांना सतर्क राहण्याचा इशारा देण्यात आला आहे. संभाव्य कारवाईसाठी तयारी सुरू असून, सीमेपलीकडे कारवाई होण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
या हल्ल्यात महाराष्ट्रासह अनेक राज्यांतील नागरिक बळी पडले असून, नागरिकांमध्ये तीव्र नाराजी आहे. पर्यटकांवर थेट हल्ला केल्यामुळे सुरक्षा व्यवस्था पुन्हा एकदा प्रश्नाच्या भोवऱ्यात सापडली आहे.
Beed News । धक्कादायक! बीडमध्ये महिलेला सरपंचासह १० जणांनी केली बेदम मारहाण