Site icon e लोकहित | Marathi News

Pakistan: पाकिस्तान कर्णधार बाबर आझमचा रिझवानसोबत विश्वविक्रम, विराट कोहलीला टाकले मागे

Pakistan captain Babar Azam's world record with Rizwan surpasses Virat Kohli

मुंबई : दुसऱ्या टी-20 सामन्यात (T20 match) पाकिस्तानने (Pakistan) त्यांच्याच घरच्या मैदानावर इंग्लंडचा 10 गडी राखून पराभव केला. तसेच पाकिस्तानने सात सामन्यांच्या मालिकेत 1-1 अशी बरोबरी केली आहे. खरतर या सामन्यात पाकिस्तान संघाचं कर्णधार बाबर आझम (Captain Babar Azam) आणि यष्टीरक्षक फलंदाज मोहम्मद रिझवानने (batsman Mohammad Rizwan) जोरदार फटकेबाजी केली. दुसऱ्या टी-20 सामन्यात इंग्लंडने (England) पाकिस्तानसाठी 200 धावांचे लक्ष्य दिले होते. दरम्यान प्रत्युत्तरात पाकिस्तान संघाने 19.3 षटकात एकही विकेट न गमावता 203 धावा करत सामना जिंकला.

लिंबू बहाराबाबत आवश्यक माहिती, वाचा एका क्लिकवर

हा सामना जिंकून कर्णधार बाबर आणि रिझवानने आपल्या नावावर विश्वविक्रम केला आहे. प्रथमच कर्णधार बाबर आणि रिझवान या जोडीने टी-20 आंतरराष्ट्रीय सामन्यात 200 किंवा त्याहून अधिक धावांचे लक्ष्य ठेवले आहे. न्यूझीलंडचा कर्णधार केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल यांचा विक्रम बाबर-रिजवानने मोडला आहे. केन विल्यमसन आणि मार्टिन गप्टिल या दोन्ही किवी सलामीवीरांनी 171 धावांची नाबाद सलामी दिली होती.

MPSC: आता एमपीएससीतून होणार लिपिक पदाची भरती, मंत्रिमंडळाच्या बैठकीत झाला महत्वपूर्ण निर्णय!

बाबर आझमने इंग्लंडविरुद्धच्या या सामन्यात 66 चेंडूत नाबाद 110 धावांची खेळी केली. आंतरराष्ट्रीय टी-20 मधील हे त्याचे दुसरे शतक होते. यासोबतच बाबरने टी-20 फॉरमॅटमध्ये आपल्या 8 हजार धावा पूर्ण केल्या असून बाबरने भारताचा माजी कर्णधार विराट कोहलीलाही मागे टाकले. बाबरने 218 डावात 8 हजार धावा पूर्ण केल्या. तर टी-20 क्रिकेटमध्ये 8000 धावा पूर्ण करण्यासाठी 243 डाव विराट कोहलीने खेळले होते.

BJP: “…तर ठाकरे सरकार कधीच कोसळलं नसतं”; भाजपच्या ‘या’ बड्या नेत्याचा दावा

Spread the love
Exit mobile version