पाकिस्तान (Pakistan) येथे एक धक्कादायक घटना घडली आहे. पेशावर येथील मशिदीत काल (दि. 30) दुपारी बॉम्बस्फोट झाला. यामध्ये अनेकांचा जीव गेला असून यामुळे पाकिस्तान पुन्हा एकदा हादरला आहे. यामध्ये आत्तापर्यंत 63 पोलिस कर्मचाऱ्यांचा मृत्यू झाला आहे. त्याचबरोबर १५० हून अधिक लोक जखमी असून ४७ लोकांची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे.
मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर भीषण अपघात, ४ जण जागीच ठार
हा बॉम्बस्फोट इतका भयंकर होता की, यामध्ये चक्क मशिदीच छत उडाल आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार हा हल्ला आत्मघातकी होता. यातील मृतांची संख्या आणखी वाढण्याची शक्यता देखील वर्तवली जात आहे. महत्त्वाची बाब म्हणजे या हल्ल्यात पोलीस कर्मचाऱ्यांचा देखील मृत्यु झाला आहे.
अदानी ग्रुपसाठी धक्कदायक बातमी, गौतम अदानी टॉप 10 श्रीमंतांच्या यादीतून बाहेर
दरम्यान जखमींची परिस्थिती गंभीर आहे. तसेच अनेक मृतदेह मशिदीत अडकल्याची भीती व्यक्त केली गेली आहे. पाकिस्तान आर्मीने (Pakistan Army) हा परिसर घेरला असून या ठिकाणी कडक बंदोबस्त ठेवण्यात आला आहे. याठिकाणी सध्या मोठ्याप्रमाणात भीतीचे वातावरण आहे.
मोठी बातमी! भारतीय सलामीवीर मुरली विजयनं जाहीर केली निवृत्ती