मुंबई : आशिया कप (Asia cup 2022) स्पर्धेत 28ऑगस्ट रोजी भारत – पाकिस्तान सामना झाला. या सामन्यात भारताने पाकिस्तानला 5 विकेटने हरवलं. भारताने सामना जिंकल्यानंर संपूर्ण देशात जल्लोष झाला. पण त्याचवेळी दुसरीकडे पाकिस्तानी चाहत्यांच्या डोळ्यात मात्र अश्रू होते. असाच एक पाकिस्तानी चाहता सोशल मीडियावर व्हायरल झाला आहे. पाकिस्तानच्या पराभवानंतर हा चाहता कोलमडला. ऑलराऊंडर हार्दिक पंड्याने षटकार ठोकल्यानंतर या चाहत्याच्या डोळ्यात अश्रूच आले .
नेमक व्हिडीओत काय व्हायरल झाल ?
हा पाकिस्तानी चाहता चक्क आपल्या दोन म्हशी विकून भारत-पाक सामना पाहण्यासाठी आला होता. त्याने या दोन म्हशी 2 लाख रुपयात विकल्या. हे दोन लाख रुपये खर्च करुन तो सामना पहायला आला होता. पण दुर्दैवाने बाबर आजमच्या टीमने मात्र पाकिस्तानी चाहत्याला विजयाच्या सेलिब्रेशनची संधी दिली नाही. आणि या चाहत्याचे दोन लाख रुपये पाण्यात गेले.
5 विकेट गमावून 19.4 षटकात विजयी
सामन्याच्या सुरवातीला पाकिस्तान संघाने फलंदाजी घेतली आणि ही फलंदाजी करताना पाकिस्तानचा डाव 147 धावात आटोपला. दरम्यान भारताने पाकिस्तानच्या खेळीला प्रत्युत्तरा देत 5 विकेट गमावून 19.4 षटकात विजयी लक्ष्य गाठलं. या विजयात हार्दिक पंड्याला सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने 25 धावा पाकिस्तानच्या तीन विकेट काढल्या. त्यानंतर फलंदाजी करताना 17 चेंडूत नाबाद 33 धावा फटकावल्या. भारताच्या विजयात मोलाची भूमिका बजावली.