Pakistani Women । मागच्या काही महिन्यापूर्वी पाकिस्तानमधील सीमा हैदर प्रियकराला भारतात आली. त्यानंतर सीमा हैदर चांगलाच चर्चेचा विषय ठरत होती. दरम्यान आता पुन्हा एकदा पाकिस्तानमधील एक महिला प्रियकराला भारतात आल्याची माहिती समोर आली आहे. पाकिस्तानातील कराची येथील रहिवासी असलेली जवेरिया खानम मंगळवारी कोलकाता येथे राहणारा तिचा प्रियकर समीर खानसोबत लग्न करण्यासाठी भारतात पोहोचली.
भारत सरकारने २१ वर्षीय महिलेला ४५ दिवसांचा व्हिसा दिला आहे. वाघा बॉर्डरवरून तिने भारतात प्रवेश केला आणि तिचे समीर आणि त्याच्या घरच्यांनी ढोल ताशा वाजवत स्वागत केले. जवेरिया भारतात आल्यानंतर या जोडप्याने मीडियाशी संवाद साधला. समीर म्हणाला, “मी भारत सरकारच्या सहकार्याबद्दल आभार मानू इच्छितो. जेव्हा हेतू चांगला असतो तेव्हा सीमांना महत्त्व नसते.”
Bjp । ब्रेकिंग! भाजपच्या १२ खासदारांनी दिले राजीनामे
समीर आणि जवेरिया पुढील वर्षी जानेवारीमध्ये लग्न करणार आहेत, त्यानंतर ती दीर्घकालीन व्हिसासाठी अर्ज करणार आहे. जवेरिया म्हणाली, “मला 45 दिवसांचा व्हिसा देण्यात आला आहे. मला इथे आल्याचा खूप आनंद झाला आहे. इथे येताच मला खूप प्रेम मिळत आहे. लग्न जानेवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार आहे.”
Sunny Deol । मद्यधुंद अवस्थेत सनी देओल मुंबईच्या रस्त्यावर; धक्कादायक व्हिडिओ व्हायरल