Accident News । पालघर : अपघातांचे (Accident) सत्र अजूनही सुरूच आहे. दररोज कित्येक अपघात होत असतात. यात अनेकांना आपले प्राण गमवावे लागतात. सध्या असाच एक भीषण अपघात घडल्याचे समोर आले आहे. एकाच दिवशी चार अपघात झाले असून या अपघातात पाच जणांचा जागीच मृत्यू झाला आहे. या दुर्दैवी घटनेमुळे परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. (Latest Marathi News)
पालघर जिल्ह्यात भीषण अपघात (Palghar Accident News) झाला आहे. वाडा भिवंडी महामार्गावर कुडूस येथे संध्याकाळच्या दरम्यान मोठ्या प्रमाणावर वर्दळ असते. महामार्गावरच वसलेल्या अनधिकृत फेरीवाल्यांमुळे या ठिकाणी वाहन चालकांना मोठा त्रास सहन करावा लागतो. येथे शुक्रवारचा बाजार होता. गर्दी जास्त असल्याने संध्याकाळी ही घटना घडली. (Palghar Accident)
Maharashtra Politics । लोकसभेपूर्वी उद्धव ठाकरेंना मोठा धक्का, बडा खासदार भाजपच्या वाटेवर
त्यामुळे आता कुडूस येथे होणाऱ्या वाहतूक कोंडीमुळे स्थानिक, ग्रामपंचायत आणि सार्वजनिक बांधकाम विभागाकडे अनधिकृत फेरीवाल्यांवर कारवाई करावी अशी मागणी केली जात आहे. परंतु सार्वजनिक बांधकाम विभाग या सगळ्याकडे दुर्लक्ष करत आहे, अशी प्रतिक्रिया नागरिकांनी दिली आहे. स्थानिक नागरिकांकडून संताप व्यक्त केला जात आहे.