Site icon e लोकहित | Marathi News

Pandhari Sheth Phadke । ब्रेकिंग! बैलगाडा प्रेमी गोल्डमॅन पंढरी शेठ फडके यांचे निधन; बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का

Pandhari Sheth Phadke Passed Away

Pandhari Sheth Phadke । सध्या एक धक्कादायक बातमी समोर आली आहे, महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यती मधील प्रसिद्ध नाव असणाऱ्या पंढरी शेठ फडके यांचे निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. यामुळे सगळीकडे मोठी हळहळ व्यक्त केली जात आहे. हृदयविकाराचा झटका आल्याने पंढरी शेठ फडके यांचे निधन झाल्याची माहिती मिळत आहे. दुपारच्या सुमारास ऑफिस वरून घरी जाताना कारमध्ये अचानक हृदयविकाराचा झटका आला आणि यामध्येच त्यांचे निधन झाले आहे. (Pandhari Sheth Phadke Passed Away)

Tania Singh । ब्रेकिंग! प्रसिद्ध मॉडेलने केली आत्महत्या

पनवेल विहिघरचे महाराष्ट्रातील प्रसिद्ध बैलगाडा मालक म्हणून त्यांची ओळख होती. आज पनवेल या ठिकाणी त्यांचे निधन झाले आहे. महाराष्ट्रातील बैलगाडा शर्यतीला ग्लॅमरस मिळवून देण्यामध्ये त्यांचा सर्वात मोठा वाटा होता. त्याचबरोबर बैलगाडा प्रेमी गोल्डन मॅन म्हणून देखील ते महाराष्ट्रभर प्रसिद्ध होते.

Disqualification Matter । शरद पवार यांना सर्वात मोठा झटका? अजित पवार यांनी खेळली मोठी खेळी

पंढरी शेठ फडके यांचा राजकारणाशी देखील संबंध आहे. ते आधी शेकाप पक्षात सक्रिय होते. त्यानंतर त्यांनी भारतीय जनता पक्षामध्ये प्रवेश केला. 1986 सालापासून वडिलांमुळे पंढरी शेठ फडके यांना बैलगाडा शर्यतीची आवड निर्माण झाली होती. आज दुपारच्या सुमारास त्यांना ऑफिस वरून घरी जाताना कारमध्ये हृदयविकाराचा झटका आला आणि त्यांचे निधन झाले आहे. पंढरी शेठ फडके यांच्या जाण्याने बैलगाडा शर्यत प्रेमींना मोठा धक्का बसला.

Parbhani News । धक्कादायक बातमी! महावितरणाच्या भोंगळ कारभारामुळे 3 वर्षांच्या मुलीचा तडफडून मृत्यू

Spread the love
Exit mobile version