Pandurang Sakpal । सध्या एक मोठी बातमी समोर आली आहे. ठाकरे गटाचे दक्षिण मुंबईतील माजी विभागप्रमुख पांडुरंग सकपाळ (Pandurang Sakpal) यांचे शनिवारी निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. शिवसेना पक्षात फूट पडल्यानंतर ठाकरे घराण्याशी इमान कायम राखणारा कट्टर शिवसैनिकाचे निधन झाले. यामुळे ठाकरे गटावर मोठी शोककळा पसरली आहे. ते 61 वर्षांचे होते.
मागच्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत ठीक नव्हती. त्यांच्यावर मुंबईतील लिलावती रुग्णालयात उपचार सुरु होते. मात्र, शनिवारी सकाळी उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला आहे. त्यांच्यावर आज संध्याकाळी पाच वाजता गिरगाव येथील चंदनवाडी स्मशानभूमीत अंत्यसंस्कार करण्यात येतील.
पांडुरंग सकपाळ हे शिवसेनेच्या जुन्या फळीतील नेत्यांपैकी एक होते. बाळासाहेब ठाकरे यांचा विश्वासू साथीदार म्हणून ते ओळखले जात होते. दक्षिण मुंबईतील एक निष्ठावंत शिवसैनिक (Shivsena) म्हणून पांडुरंग सपकाळ यांची ओळख होती.
Ajit Pawar । पुणे पोर्श कार अपघातावर उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी दिली पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…