Pankaj Tripathi | अभिनेते पंकज त्रिपाठी त्यांच्या अभिनयामुळे कायम चर्चेत असतात. सध्या त्यांच्यावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. पंकज त्रिपाठी यांचे वडील पंडीत बनारस तिवारी यांचं निधन झाल्याची माहिती समोर आली आहे. ते 98 वर्षांचे होते. त्यांनी गावी अखेरचा श्वास घेतला. वडिलांच्या जाण्याने पंकज त्रिपाठी यांना मोठा धक्का बसला आहे.
एका व्यक्तीच्या नावावर किती जमीन असू शकते? काय सांगतो कायदा जाणून घ्या
पंकज त्रिपाठी यांचे वडील बिहारच्या गोपालगंज जिल्ह्यात असून ते बेलसंड नावाच्या गावी राहायचे. त्याच ठिकाणी त्यांचे निधन झाले आहे. बेलसंड गावी त्यांच्या वडिलांनी अखेरचा श्वास घेतला आहे. वडिलांच्या निधनाचं वृत्त कळताच पंकज त्रिपाठी त्यांच्या गावी रवाना झाले असल्याची माहिती समोर आली आहे.
Wheat Variety । शास्त्रज्ञांनी तयार केले गव्हाचे 3 वाण, 150 दिवसांत मिळेल भरघोस उत्पादन
पंकज त्रिपाठी वडिलांच्या कायम जवळ असायचे त्याचबरोबर सोशल मीडियावरील पोस्टद्वारे किंवा विविध मुलाखतींमध्येही ते अनेकदा त्यांच्या आयुष्यातील आईवडिलांच्या योगदानाबद्दल व्यक्त व्हायचे. “जर माझ्या पालकांनी माझ्या निर्णयांचा आदर केला नसता तर आज मी इथे नसतो”, असे ते कायम म्हणायचे त्यामुळे त्यांच्या जाण्याने त्यांना मोठा धक्का बसला आहे.
Talathi Bharti । तलाठी भरतीच्या परीक्षेत पुन्हा गोंधळ! परीक्षेच्या सर्व्हरमध्ये बिघाड