
Pankaj Udhas passed away । मनोरंजन विश्वातून एक वाईट बातमी समोर आली आहे. प्रसिद्ध गझल गायक पंकज उधास यांचे २६ फेब्रुवारी रोजी निधन झाले. ते 72 वर्षांचे होते. त्यांच्या निधनाने संगीत विश्वात शोककळा पसरली आहे. उधासजी दीर्घकाळ आजारी होते. मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात त्यांचे निधन झाले. ते आपल्या आवाजाने लाखो हृदयांवर राज्य करत असे. (Pankaj Udhas passed away)
Manoj Jarange Patil । कोर्टाचा जरांगे पाटलांना मोठा दणका! सरकारला दिले नवीन आदेश
त्यांचा जन्म 17 मे 1951 रोजी गुजरातमधील जेतपूर येथे झाला. तीन भावांमध्ये ते सर्वात लहान होते. मंगळवारी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. पंकज उधास यांनी 1980 मध्ये त्यांचा पहिला गझल अल्बम “आहट” रिलीज केला आणि त्यानंतर “मुकरार”, “तराना”, “मेहफिल” यासह अनेक यशस्वी अल्बम रिलीज केले.
2006 मध्ये त्यांना भारतातील चौथा सर्वोच्च नागरी सन्मान पद्मश्रीने सन्मानित करण्यात आले. पंकज उधास त्यांच्या सुरेल आवाजासाठी आणि भावपूर्ण गायनासाठी ओळखले जात होते. त्यांच्या गाण्यांनी लाखो लोकांच्या हृदयाला स्पर्श केला आहे. पंकज उधास यांच्या निधनाने संगीत जगताची मोठी हानी झाली आहे. त्यांचा आवाज आणि गाणी कायम स्मरणात राहतील.
Manoj Jarange । बिग ब्रेकिंग! मनोज जरांगे पाटलांची मोठी घोषणा