
भाजपकडून सतत डावलले जाण्याची भावना आणि इतर राजकीय पक्षांकडून येत असलेल्या ऑफर्स यामुळे पंकजा मुंडे मागील काही दिवसांपासून चर्चेत आहे. त्यांचे बंधू धंनजय मुंडे व त्यांच्यात कायम टिकायुद्ध सुरू असतेच. दरम्यान पंकजा मुडेंनी (Pankaja Munde) नुकत्याच झालेल्या एका कार्यक्रमात धनंजय मुंडे यांच्यावर सणसणीत टीका केली आहे.
नागराज मंजुळेंच्या अजून एका नवीन गाण्याने सोशल मीडियावर घातला धुमाकूळ; पाहा VIDEO
बीडच्या ( Beed) परळी मधील कौठळी गावात ‘जल जीवन मिशन’ योजनेचा शुभारंभ सोहळा काल पार पडला. पंकजा मुंडेंनी या कार्यक्रमाला उपस्थिती लावली होती. यावेळी ” तुम्हाला घरा-घरांमध्ये पाणी देणारा नेता पाहिजे की घरा-घरांत चपटीची बॉटल देणारा नेता पाहिजे, असे म्हणत पंकजा मुंडे यांनी नाव न घेता राष्ट्रवादीचे आमदार धनंजय मुंडे यांचा पाणउतारा केला.
“एका महिलेने चिंचवडमध्ये पाडलं”, निलेश राणे यांची अजित पवारांवर जोरदार टीका
“गोपीनाथ मुंडे साहेबांच्या नंतर तुम्ही सगळे माझे नाव घेता, कारण तुम्हाला कुशल अन् चांगला नेता हवा आहे. खरंतर, मी निवडणुकीमध्ये हरले तेव्हापासून तुमच्या मोबाईलवरचे मेसेज येणं बंद झाले. राजकारणात पैसे वाटणारा,तमाशा दाखवणारा,मत विकत घेणारा, भ्रष्टाचार करणारा व खोटे गुन्हे दाखल करणारा चारित्र्यहीन ‘व्हिलन’ असते.” असे देखील पंकजा मुंडे यावेळी म्हणाल्या आहेत.
आत्ताची सर्वात मोठी बातमी! संदीप देशपांडे हल्ला प्रकरणात फडणवीसांच नाव; चर्चांना उधाण