Pankaja Munde । महाराष्ट्रातील विधान परिषद निवडणुकीसाठी (Legislative Council Elections) भाजपने (Bjp) पाच उमेदवारांची यादी जाहीर केली आहे. या यादीत पंकजा मुंडे यांच्या नावाचाही समावेश आहे. पंकजा मुंडे यांनी बीडमधून लोकसभा निवडणूक लढवली होती आणि त्यांना पराभवाला सामोरे जावे लागले होते. मुंडे यांच्यानंतर भाजपने योगेश टिळेकर, परिणय फुके, अमित गोरखे, सदाभाऊ खोत यांना उमेदवारी दिली आहे. यंदा महाराष्ट्रात विधान परिषदेच्या 11 जागांसाठी निवडणूक होणार आहे.
Lonavala News । लग्नासाठी आले अन् भुशी डॅम फिरायचं ठरवलं; पण घडलं भयानक
विधान परिषद निवडणुकीसाठी भाजपने 11 नावांची यादी केंद्रीय नेतृत्वाकडे पाठवली होती. आगामी विधानसभा निवडणुका डोळ्यासमोर ठेवून भाजपच्या दिग्गजांनी यापैकी पाच नावांना मंजुरी दिली आहे. या निर्णयामुळे पंकजा मुंडे अनेक वर्षांनंतर पुन्हा एकदा सभागृहात दिसणार आहेत. मात्र, पंकजा मुंडे यांची विधानपरिषदेची उमेदवारी अनेक अर्थांनी अत्यंत महत्त्वाची मानली जात आहे.
पंकजा मुंडे यांच्या संसदीय राजकारणातील प्रवासात काही चढ-उतार होते. नुकत्याच झालेल्या लोकसभा निवडणुकीत त्यांना बीड लोकसभा मतदारसंघातून भाजपने उमेदवारी दिली होती. मात्र महाविकास आघाडीच्या वतीने राष्ट्रवादी काँग्रेसचे शरदचंद्र पवार यांच्या पक्षाचे उमेदवार बजरंग सोनवणे यांनी पंकजा मुंडे यांचा पराभव केला.
Bjp । ब्रेकिंग न्यूज! भाजपने जाहीर केली विधानपरिषदेच्या ५ उमेदवारांची नावे