Pankaja Munde । मराठा समाजाने आरक्षणाचा (Maratha Reservation) मुद्दा चांगलाच लावून धरला आहे. जोपर्यंत ओबीसींमधून आरक्षण मिळत नाही तोपर्यंत शांत बसणार नाही, अशी भूमिका मराठा समाजाने घेतली आहे. भाजप नेत्या पंकजा मुंडे यांनीदेखील मनोज जरांगे पाटील यांच्या आंदोलनाला पाठिंबा दिला होता. पण आता पंकजा मुंडे यांनी युटर्न घेतला आहे. (Pankaja Munde vs Manoj Jarange Patil)
Madha Lok Sabha । शरद पवारांचा शिंदे गटाला मोठा धक्का, बडा नेता करणार पक्षात प्रवेश
“सध्या अनेकजण उपोषण करत आहेत. पण उपोषण करून काहीही मिळत नाही, अशी जहरी टीका पंकजा मुंडे यांनी जरांगे पाटलांचं नाव न घेता केली आहे. त्यामुळे अनेकांना आश्चर्याचा धक्का बसला आहे. पंकजा मुंडेंच्या या टीकेवर आता जरांगे पाटील कशाप्रकारे उत्तर देतात? याकडे राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
Baramati Loksabha । अजित पवार आणि सुनेत्रा पवारांकडे आहे ‘इतकी’ मालमत्ता, समोर आली महत्त्वाची माहिती
पुढे त्या म्हणाल्या की, “बीड जिल्ह्यातील कोणताही व्यक्ती माझ्या दारावर आला असता तर मी कधीच त्याला त्याची जात विचारली नसती. प्रत्येकाला मी मदत करत आले आहे. निवडणुकीत राजकारण आणायची गरज नाही. माझ्या हातात तराजू असून मी उज्ज्वल भविष्यात अडचण आणणारी परिस्थिती पाहत आहे, नरेंद्र मोदी हे तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, असा दावा देखील पंकजा मुंडे यांनी केला आहे.
Supriya Sule । राजकीय वर्तुळात खळबळ! सुप्रिया सुळेंबाबत धक्कादायक बातमी समोर