मुंबई : झी मराठीच्या ‘उंच माझा झोका’ (unch majha jhoka) या पुरस्कार सोहळ्याला 7 वर्ष पूर्ण झाले आहेत. दरम्यान या वर्षी म्हणजे 2022 ला या सोहळ्याला 8 वे वर्ष लागले आहे. दरम्यान यावर्षीच्या पुरस्कार सोहळ्याचे मला अभिमान आहे’ अस ब्रीदवाक्य आहे.उंच माझा झोका या पुरस्कार सोहळ्याचे वैशिष्टय म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात समाजातील विविध स्तरात आपलं नाव उंच करणाऱ्या महिलांचा सन्मान केला जातो.
विशेष म्हणजे झी मराठी (Zee Marathi) नेहमीच आपल्या प्रेक्षकांसाठी नवनवीन आणि प्रेरणादायी कार्यक्रम घेऊन येत असते.यावर्षीच्या उंच माझा झोका’ या पुरस्कार सोहळ्याची खास गोष्ट म्हणजे भाजप नेत्या पंकजा मुंडे (pankaja munde) या सोहळ्याचं निवेदन करणार आहेत. तसच पंकजा मुंडे यांच्या सोबत अभिनेत्री क्रांती रेडकर (kranti redkar) सुद्धा या सोहळ्यात निवेदन करणार आहेत.
दरम्यान या सोहळ्यासाठीचा पंकजा मुंडे यांचा लूक मन मोहून टाकणारा आहे.एक व्हिडीओ झी मराठीने पंकजा मुंडेंचा लुक समोर आला होता पण आता पंकजा मुंडे यांचा तयार होण्याआधीच आफ्टर बिफोर असा पोस्ट केला आहे.
बीएड – डिएडधारकांसाठी खुशखबर! नोव्हेंबरमध्ये पुन्हा होणार टीईटी परीक्षा
तसेच महत्वाची बाब म्हणजे या पुरस्कार सोहळ्यात आपल्या कर्तृत्वाने समाजात योगदान देऊन समाजाला सुदृढ वैचारिकरित्या समृद्ध करणाऱ्या विविध क्षेत्रातील महिलांचा यावेळी गौरव करण्यात येईल. ‘