देवेंद्र फडणवीसांच्या कार्यक्रमाला पंकजा मुंडे पुन्हा गैरहजर, राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण

Pankaja Munde's absence from Devendra Fadnavis' program sparks debate in political circles

मागील बऱ्याच दिवसांपासून पंकजा मुंडे ( Pankja Munde) यांना भाजपकडून सातत्याने डावलले जात आहे. यामुळे पंकजा मुंडे नाराज असल्याच्या चर्चा कायम होत असतात. स्वर्गीय गोपीनाथ मुंडे यांच्या जेष्ठ कन्या पंकजा मुंडे भाजपामधील एक महत्त्वाच्या नेत्या आहेत. परंतु, त्या भाजपाला सोडचिठ्ठी देणार असल्याची माहिती मागील काही दिवसांत समोर येत होती. दरम्यान, बीड जिल्ह्यातील गहीनाथगडावरील संत वामनभाऊ महाराज यांच्या पुण्यतिथी सोहळा पार पडणार असून या कार्यक्रमाला फडणवीस उपस्थितीत राहणार आहेत .मात्र पंकजा मुंडे आणि खासदार प्रीतम मुंडे या दोघी भगिनी उपस्थित राहणार नाहीत. त्यामुळे राजकीय वातावरणात चर्चाना उधाण आले आहे.

बिग ब्रेकिंग! किशोरी पेडणेकर यांच्यावर गुन्हा दाखल

मध्यंतरी शरद पवारांच्या राष्ट्रवादी काँग्रेस ( NCP) पक्षाकडून पंकजा मुंडे यांना ऑफर आली होती. दरम्यान आता ठाकरे गटाकडून देखील त्यांना ऑफर आली आहे. शिवसेनेचे ( उद्धव बाळासाहेब ठाकरे) नेते आमदार सुनील शिंदे यांनी याबाबत वक्तव्य केले होते. “भाजपमध्ये पंकजा मुंडेंवर अन्याय होतोय. ही त्यांच्या पक्षांतर्गत बाब असून त्यावर आम्ही काही बोलणार नाही. मात्र, त्यांच्या कर्तृत्वाची आम्हाला नेहमीच कदर असेल. त्यामुळे त्यांना शिवसेनेत यायचे असेल तर त्यांचे आम्ही स्वागत करु.” असे सुनील शिंदे म्हणाले होते.

महाराष्ट्र केसरी जिंकताच शेतकरीपुत्र शिवराजसाठी समोर आली मोठी गुडन्यूज

ठाकरे गटाकडून आलेल्या थेट आमंत्रणामुळे पंकजा मुंडे ठाकरे गटात जाणार अशा चर्चा रंगल्या होत्या. परंतु, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ( Devendra Fadanvis) व भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी प्रसार माध्यमांशी संवाद साधत या चर्चांना पूर्णविराम दिला आहे. पंकजा मुंडे भाजपामध्ये खुश असून कोणत्याही प्रकारे त्या पक्ष सोडणार नाहीत. अशी माहिती त्यांनी दिली आहे.

“आम्हीही राजकारणामध्ये कुस्ती करतो, पण…” देवेंद्र फडणवीसांच वक्तव्य चर्चेत

Spread the love

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *